राज्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रामध्ये कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे देखील उकाड्याने हैराण झाली आहेत. उन्हाळ्यात शाळांना सुट्टी लागल्यामुळे बरेच जण थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंद करतात. पण यंदा तीव्र उष्णतेमुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्या घटली आहे आणि हवामान देखील खूप गरम झाले आहे. महाराष्ट्रामध्ये थंड हवेची अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर आणि पाचगणी ही काही प्रमुख ठिकाणे आहेत जी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.परंतु, यावर्षी या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे, पर्यटकांची संख्या घटली आहे.
थंड हवेचे ठिकाण
कमाल तापमान अंश सेल्सिअस

- महाबळेश्वर (जि. सातारा) ३३.६°
- माथेरान (जि. रायगड) ३४.०४°
- पाचगणी(जि.सातारा) ३४°
- लोणावळा (जि. पुणे) ३८°
- इगतपुरी (जि. नाशिक) ३९°
- तोरणमाळ (जि. नंदुरबार) ३९°
- बुलढाणा ३९.०२°
थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या घटण्याचे कारण
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)