स्टार्टअप ही लोकचळवळ होऊन, व्यापार वाढला पाहिजे, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे प्रतिपादन

डेटा अ‍ॅनालिटिक्ससाठी, कचरा व्यवस्थापन आणि सर्क्युलर इकॉनॉमी, पर्यावरणपूरक व नैसर्गिक गृह स्वच्छता उपाय, ड्रोन व सर्वेक्षण तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील संपूर्ण देशभरात उत्कृष्ट असलेले स्टार्ट अप्स म्हणून नोंद असलेल्या या स्टार्टअप्सनी आपल्या कामाची माहिती यावेळी दिली.

Mangal Prabhat Lodha : एकेकाळी ‘सोने की चिडिया’ म्हटलं जात होत. भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, भारताला देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्ट अप ही लोकचळवळ व्हायला हवी. शासनाच्या सहा विभागांनी र्स्टाटअप्स सोबत काम करण्यास अनुमती दर्शवली आहे. अशी माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण  करण्याच्या उद्देशाने सामान्य प्रशासन विभागामार्फत “टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा  5 ते 9 मे दरम्यान कार्यक्रम आयोजित केला होता.

स्टार्टअपची संख्या वाढली पाहिजे…

दुसरीकडे ग्रामीण भागात स्टार्टअपची संख्या वाढण्यासाठी कौशल्य आणि नाविन्यता विभाग प्रयत्न करत असून मुख्यमंत्री फडणवीस स्वतः यात लक्ष घालत असल्याचे लोढा यांनी  यावेळी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला विकसित करण्याच्या दृष्टीने स्टार्ट अप सारख्या योजना आणल्या आहेत. यात अनेकांनी देशाचे नाव उंचावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानेही स्टार्ट अपमध्ये देशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात स्टार्ट अपची संख्या कमी असल्याची खंतही मंत्री लोढा यांनी यावेळी बोलून दाखवली.

देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात…

२८ हजार ४०६ र्स्टाटअप्सच्या माध्यमातून  ३ लाख पेक्षा अधिक रोजगार निर्माण झाला आहे. यामध्ये १४००० पेक्षा जास्त स्टार्टअप महिला नेतृत्वाखाली आहेत. महाराष्ट्र स्टार्ट अप २०२५ हे नवीन येणारे धोरण, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे कामकाज गतीमान पध्दतीने सुरू आहे, देशात सर्वाधिक स्टार्टअप्स असलेले आपले राज्य असून महाराष्ट्र स्टार्ट अप याबद्दल अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.

About Author

Astha Sutar

Other Latest News