Virat Kohli – भारतात क्रिकेटला धर्मच मानला जातो. इथे गल्लीबोळात… नाक्या नाक्यावर… चौकात क्रिकेट खेळले जाते. आणि क्रिकेटपटूंना हे क्रिकेटचाहते आपला आदर्श मानतात. भारतात क्रिकेटचा देव म्हणून सचिनकडे पाहिले जाते तर आता स्टार क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या धक्क्यातून फॅन्स सावरत नाही तोच दिग्गज फलंदाज विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे म्हटले आहे.
मला कसोटीतून निवृत्त व्हायचं आहे…
दरम्यान, सचिन तेंडुलकर नंतर भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या आहेत. रनमशीन म्हणून विराट कोहलीकडे पाहिले जाते. त्याच विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती होण्याच्या विचारात आहे. मला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हायचं आहे, असा विराटने निरोप भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला कळवला आहे. त्यामुळे रोहित शर्मा याचा कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीतून क्रिकेट चाहते सावरत नाही तोच विराटने आणखी एक फॅन्सना धक्का दिला आहे. परंतु विराटने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती बीसीसीआयच्या प्रमुखांनी विराट कोहलीला केली आहे.

आगामी इंग्लंड दौरा महत्त्वाचा…
जून-जुलै महिन्यात भारतीय इंग्लंड दौरा करणार आहे. इथे 20 जून ते 25 जून दरम्यान पाच कसोटी सामन्याची मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेसाठी अजून भारतीय संघाची निवड झालेली नाही. मात्र या संघात अनुभवी आणि दिग्गज खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली नसल्यामुळे भारतीय संघ नवखा वाटोत. त्यामुळे इंग्लंडचा दौरा महत्त्वाचा असताना विराटने निवृत्ती घेऊन नये किंवा त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयने केली आहे. परंतु आता बीसीसीआयच्या या विनंतीनंतर विराट कोणता निर्णय घेतो, तो निवृत्ती मागे घेतो का? आणि इंग्लंड दौरा खेळतो का? याकडेच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
विराटची कसोटी कारकिर्द कशी आहे?
विराट कोहलीने भारताकडून 123 कसोटी सामने खेळले आहेत. यात 46.85 च्या सरासरीने त्याने 9223 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने गेल्या वर्षी भारत आणि T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर आता लगेचच त्याने कसोटी क्रिकेटमधून ही निवृत्तीची घोषणा केल्यामुळे त्यांच्या फॅन्सना जबर धक्का बसला आहे. परंतु बीसीसीआयच्या विनंतीनंतर विराट कोहली आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेणार काय़ हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.