सैनिक हो तुमच्यासाठी! राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मंत्री लोढा यांची 150 वर्ष प्राचीन माधवबाग मंदिरात भारतीय सैन्यासाठी पूजा

भारतीय सैनिकांंच्या पाठीशी उभं राहणं ही आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यांना बळ मिळावे, यासाठी आम्ही पूजा केली, देवाकडे साकडे घातले

Governor C.P. Radhakrishnan – सध्या भारत पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळं यात भारतीय सेनेला बळ, प्रोत्साहन मिळावे, आणि भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा, यासाठी देशात होम हवन, पूजा केली जात आहे. याच धरतीवर मुंबईतील १५० वर्षे जुन्या भुलेश्वर परिसरातील माधवबाग लक्ष्मी नारायण मंदिराला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली. तसेच मंदिरातील धार्मिक विधींमध्ये सहभागी होत त्यांनी दर्शन घेतले.

सैनिकांसाठी पूजा केली…

दरम्यान, राज्यपाल आणि मंत्री लोढा यांनी मंदिरातील दर्शन घेतल्यानंतर भारत-पाकिस्तान संघर्षात सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांचे मनोबल वाढावे, त्यांना मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी विशेष प्रार्थना आणि पूजा करण्यात आली. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सर्वांनी शहिदांच्या आत्म्याला शांती लाभो आणि सैन्याचे मनोबल सदैव कणखर राहो, अशी प्रार्थना करण्यात आली.

भारताचं सैन्य हे जगातील सर्वोत्तम सैन्य…

यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “भारताचं सैन्य हे जगातील सर्वोत्तम सैन्यांपैकी एक आहे. त्यांची तांत्रिक क्षमता, मानसिक ताकद आणि देशभक्ती अद्वितीय आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यांना बळ मिळावे, यासाठी आम्ही पूजा केली, देवाकडे साकडे घातले” असं मंत्री लोढा म्हणाले. मंदिराला १५० वर्ष पूर्ण झाल्या प्रसंगी मंदिरात भगवान महादेवाचे, हनुमंताचे आणि गोमातेचे पूजन करण्यात आले.


About Author

Astha Sutar

Other Latest News