बेस्टच्या भाडेवाडीला मविआसह अन्य पक्षांचा विरोध, सरकार खासगीकरण करतंय, काँग्रेसचा आरोप

बेस्टमधील उत्पन्न वाढवा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट व्यवस्थापनाला सांगितले होते. यानंतर ९ तारखेला नंतर बेस्टचे दुप्पट भाडेवाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांचे महागाईमुळे अधिच कंबरडे मोडले असताना, आता दुप्पट भाडेवाडीमुळे मुंबईकर आणखी डबघाईस जाईल, असं बोललं जातंय.

Mumbai Best Buses : मुंबईची रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. त्याच प्रकारे मुंबईची बेस्ट बसेस ही सुद्धा मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या बेस्ट बसेसमधून अत्यंत अल्प दरात प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांचे बेस्ट ही दळणवळणाचे मुख्य साधन मानले जाते. परंतु याच बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकारने दुप्पट भाडेवाढ केली आहे. या भाडेवाडीला आता अनेक संघटना तसेच विरोधी पक्षाने ही विरोध केला आहे.

आधीच महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे, यात आता बेस्ट भाडेवाढ करून सरकारने सामान्य लोकांना धक्का दिला आहे, सरकारने बेस्टसाठी आर्थिक मदत केली पाहिजे, असं मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

बेस्टचे सरकार खासगीकरण करतंय…

दरम्यान, सरकारने बेस्टचे दुप्पट भाडेवाढ केली आहे. पाच किलोमीटरच्या ठिकाणी विना वातानुकूलित बसेसचे  पाच रुपये तिकीट होते, तिथे आता दुप्पट म्हणजे दहा रुपये तिकीट झाले तर वातानुकूलितसाठी सहा रुपये तिकीट होते. तिथे 12 रुपये तिकीट झाले. त्यामुळे राज्य सरकारने बेस्टला मदत केली पाहिजे…, आर्थिक मदत केली पाहिजे. बेस्ट उभारणीसाठी सहाय्य केले पाहिजे. पण राज्य सरकारच बेस्टचे खासगीकरण करण्यास प्रोत्साहन देत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

सरकारने बेस्टला मदत केली पाहिजे…

तर मागील तीन वर्षापासून पालिकेत प्रशासन आहे. सामान्य लोकांचा आवाज उठवणारे नगरसेवक नाहीत. निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासन आणि राज्य सरकार मनमानी करत आहे. पालिकेतील एफडी ही सरकारने मोडली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने बेस्टला उभारणीसाठी मदत केली पाहिजे. परंतु त्याच्याऐवजी सर्वसामान्यांसाठी जी जीवनवाहिनी समजले जाते, त्याचे बेस्टचे भाडेवाढ करून सामान्य लोकांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी केलाय. तर बेस्ट भाडेवाढ करून सामान्य लोकांना सरकारने धक्का दिला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News