आज आपण स्वयंपाकघराबद्दल जाणून घेऊ. स्वयंपाकघर हा संपूर्ण घराचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. आज आपण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे आणि स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे जाणून घेऊया….
स्वयंपाकघर कोणत्या दिशेला नसावे?
घरात स्वयंपाकघराची जागा खूप महत्त्वाची असते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर दक्षिण दिशेला बांधू नये. असे केल्याने वास्तुदोष होऊ शकतो, ज्यामुळे जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. दक्षिण दिशा ही यम दिशा मानली जाते, वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशा नकारात्मक ऊर्जा आणि मृत्युशी संबंधित आहे. दक्षिण-पश्चिम दिशा ‘मृत्यु’ आणि ‘अन्न’ यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे या दिशेला स्वयंपाकघर असणे चांगले मानले जात नाही. येथे स्वयंपाकघर असल्यास, घरातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात किंवा आर्थिक अडचणी येऊ शकतात.

स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे?
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला (दक्षिण-पूर्व) असावे, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी टिकून राहते. गॅस स्टोव्ह आग्नेय दिशेला ठेवावा आणि स्वयंपाक करताना व्यक्तीचा चेहरा पूर्वेकडे असावा.
भांडी कोणत्या दिशेला ठेवावीत?
खिडकी कोणत्या दिशेला असावी?
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)