तिरूपती बालाजीच्या भक्तांसाठी खुशखबर, महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून धावणार विशेष एक्सप्रेस

तिरूपती बालाजीकडे जाणाऱ्या महाराष्ट्रातील भक्तांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रातून आणखी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन आता तिरूपतीसाठी धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तिरुपती बालाजी ही दक्षिण भारतातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्री मानली जाते. महाराष्ट्रातील लाखो भक्त दरवर्षी श्रद्धेने आणि भक्तीभावाने तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जातात. विशेषतः आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि दिवाळीसारख्या सणांनिमित्त ही संख्या अधिक वाढते. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांमधून अनेक भाविक रेल्वे, बस आणि खासगी वाहनांद्वारे तिरुपतीकडे प्रयाण करतात.

बऱ्याच भाविकांसाठी हे दर्शन जीवनातील महत्त्वाचे ध्येय असते. दरवर्षी हजारो महाराष्ट्रीयन भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन आपले संकल्प पूर्ण करतात. हे श्रद्धास्थान त्यांच्या धार्मिक आस्थेचे केंद्र बनले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील भक्तांसाठी आणखी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन जालना शहरातून धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जालना-तिरूपती विशेष ट्रेन

रेल्वेने जालना ते तिरुपती या मार्गावर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन जालन्यातून चालवली जाणार असून ती तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अतिशय सोपा पर्याय ठरणार आहे. जालना ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन 7 जुलै 2025 पासून 31 मार्च 2026 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही ट्रेन दर सोमवारी सकाळी जालना रेल्वे स्थानकातून रवाना होईल आणि मंगळवारी सकाळी वाजता तिरुपतीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन मंगळवारी तिरुपती येथून सोडली जाईल आणि बुधवारी जालना स्थानकावर पोहोचेल. या वेळापत्रकामुळे भाविकांना अवघ्या तीन दिवसांत तिरुपती दर्शन आणि परतीचा प्रवास पूर्ण करता येणार आहे.

विशेष एक्स्प्रेसचे वेळापत्रक आणि थांबे

ट्रेन क्रमांक 07609 ही विशेष ट्रेन सोमवारी सकाळी 7:00 वाजता जालन्याहून सुटेल आणि मंगळवारी सकाळी 10:45 वाजता तिरुपतीला पोहोचेल. त्यानंतर परतीच्या प्रवासात परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 07610 क्रमांकाची ट्रेन दर मंगळवारी दुपारी 3:15 वाजता तिरुपतीहून सुटेल आणि बुधवारी दुपारी 3:30 वाजता जालन्याला पोहोचेल. या विशेष ट्रेनमुळे जालन्यासह मराठवाड्यातील प्रवाशांना थेट तिरुपतीला जाणे सोयीचे होणार आहे.

ही विशेष एक्सप्रेस ट्रेन (07609/07610) जालना ते तिरुपती या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा घेणार आहे. यामध्ये परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद, लिंगमपल्ली, गुटूर, गुडूर आणि रेनीगुंटा या स्थानकांचा समावेश आहे. या थांब्यांमुळे मराठवाड्यातील विविध भागांतील भाविकांना तिरुपतीला जाण्यासाठी थेट आणि सोपा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे तुमचा देखील मराठवाड्यातून तिरूपतीकडे जाण्याचा प्लॅन असेल तर ही विशेष एक्स्प्रेस तुमच्या सोयीची ठरू शकते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News