तुळशीची माळ घालतल्यावर ‘या’ नियमांकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या नियम

तुळशीची माळ घालणे हे पवित्र आहे. त्यामुळे, माळ घालणाऱ्यांनी माळीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना माळेच्या शुभ परिणामांचा लाभ होईल.

हिंदू धर्मात तुळशीची माळ खूप पवित्र मानली जाते. भगवान विष्णू आणि कृष्ण यांच्या भक्तीचे प्रतीक म्हणून बरेच लोक ती घालतात. पण फक्त ती धारण केल्याने तुम्हाला पुण्य मिळत नाही, यासाठी काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुळशीची माळ घालताना काही नियमांकडे दुर्लक्ष केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. माळ घालण्यापूर्वी आणि घातल्यानंतर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे माळेचे शुभ परिणाम मिळतील. जाणून घेऊया तुळशीची माळ घालण्याचे नियम…

मांसाहार आणि मद्यपान

मांसाहार आणि मद्यपान करणाऱ्यांनी तुळशीची माळ घालू नये, कारण तुळशी माळ ही आध्यात्मिक आणि पवित्र मानली जाते. तुळशीची माळ घातल्यावर मांस, मासे, अंडी, लसूण, कांदा यांसारख्या गोष्टींचे सेवन टाळणे आवश्यक आहे. तसेच, मद्यपान करणे किंवा धूम्रपान करणे देखील टाळले पाहिजे, कारण यामुळे माळेचे पावित्र्य भंग पावते. तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीने शक्यतो सात्विक आहार घ्यावा, म्हणजे मांसाहार किंवा तामसिक गोष्टी टाळणे चांगले. 

अंगोळ आणि अस्वच्छ कपडे

तुळशीची माळ घातल्यावर काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आंघोळ केल्याशिवाय किंवा अस्वच्छ कपड्यांनी माळेला स्पर्श करणे टाळले पाहिजे. आंघोळ केल्याशिवाय तुळशी माळेला स्पर्श करणे टाळा. अस्वच्छ कपड्यांनी किंवा शरीराने माळेला स्पर्श करू नका.

स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्कार

स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्कारात तुळशीची माळ घालणे टाळावे. तुळशीची माळ ही पवित्र मानली जाते, त्यामुळे स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्कारासारख्या ठिकाणी ती घालणे योग्य नाही. यामुळे माळेचा अनादर होतो आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. 

माळ वारंवार काढू नका

एकदा माळ घातल्यानंतर ती वारंवार काढणे किंवा बदलणे टाळावे. यामुळे माळेची ऊर्जा कमी होऊ शकते. 

अशुद्ध ठिकाणी माळ घालू नका

झोपताना, आंघोळ करताना किंवा तामसिक अन्न (जसे कांदा, लसूण, मांसाहार) खाताना माळ काढणे चांगले. धार्मिक दृष्ट्या या गोष्टी अशुद्ध मानल्या जातात आणि यामुळे माळेची आध्यात्मिक शक्ती कमी होऊ शकते.

रुद्राक्ष आणि तुळशीची माळ एकत्र घालू नका

रुद्राक्ष आणि तुळशी माळ एकत्र घालू नये, कारण दोन्हीचा प्रभाव एकमेकांवर होतो, ज्यामुळे आध्यात्मिक परिणाम कमी होऊ शकतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News