मुंबईच्या मोठ्या गणेशमूर्ती विसर्जित करण्याचा एकच पर्याय, इतर दोन पर्यायांचं काय होणार?

मुंबई हायकोर्टानं पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी मागे घेतली असली तरी मंडळांच्या मोठ्या मूर्तींचं विसर्जन ही बाब अद्यापही मार्गी लागलेली नाही. यासाठी पुन्हा कोर्टात आणि केंद्रात लढा देण्यात येईल असं सत्ताधारी सांगतायेत

मुंबई- यंदाच्या गणेशोत्सवात सर्वाधिक गाजणारा मुद्दा असेल तो सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनाचा. पीओपीच्या मूर्तींवरील निर्बंध हटवत मुंबई हायकोर्टानं गणेश भक्तांना दिलासा दिला. मात्र यंदा पीओपी मुर्तींचं विसर्जन समुद्र अथवा नैसर्गिक तलावात करता येणार नाही. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेसमोर कृत्रिम तलाव हाच एकमेव पर्याय आहे.

मुंबईती सार्वजनिक गणेशोत्सवाची ओळख ही उंच मूर्तींचा गणेशोत्सव अशी आहे. गणेश मंडळं बहुतांशपणे मोठ्या उंचीसाठी पीओपी मूर्तींना प्राधान्य देतात. आता २० ते२२ फुटांच्या उंचीचं विसर्जन जर कृत्रिम तलावात करायचं असेल तर असे तलाव आणायचे कुठेून असा प्रश्न निर्माण झाला आहे .

समुद्रात विसर्जनासाठी प्रयत्न?

मुंबई हायकोर्टानं पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी मागे घेतली असली तरी मंडळांच्या मोठ्या मूर्तींचं विसर्जन ही बाब अद्यापही मार्गी लागलेली नाही. यासाठी पुन्हा कोर्टात आणि केंद्रात लढा देण्यात येईल असं सत्ताधारी सांगतायेत. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असल्यामुळे हा मुद्दा प्रचाराचा ठरण्याची शक्यता आहे.

गणेश मंडळांसमोर काय पर्याय?

पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जातील, असं प्रतिज्ञापत्र मुंबई महापालिका ३० जूनला हायकोर्टात सादर करणार असल्याचं समजतंय. मुंबईत दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींची संख्या सुमारे 7 हजारांपेक्षा जास्त आहे. पीओपी बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावव्यतिरिक्त अन्य कोणता पर्याय नाही
मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव उपलब्ध करावे लागणार कृत्रिम तलाव उभारण्यासाठी मोठी मैदानं, मोकळ्या जागा शोधाव्या लागणार आहेत. तरीही मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन ही बाब वादाची ठरण्याची शक्यता आहे.

इतर कोणते पर्याय?

मोठ्या मूर्तींची उंची लक्षात घेता, विसर्जनासाठी किमान 10 ते 15 फूट खोलीचे कृत्रिम तलावांची निर्मिती करावी लागणार. तांत्रिकदृष्ट्या मोठे कृत्रिम तलाव उभारणे अडचणीचे असून खर्चिक असतील. विसर्जनासाठी क्रेनसह अन्य यंत्रणेची आवश्यकता आणि उपलब्धताही करुन द्यावी लागेल.

अशा स्थितीत मोठे तलाव मिळाले नाही तर पुणे किंवा गिरगाव पॅटर्नचा वापर मंडळांना करावा लागणार आहे.

पुणे पॅटर्न काय?

पुण्यात मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन दरवर्षी करण्यात येत नाही. विसर्जन मिरवणुकीत या मूर्ती मुळा-मुठा नद्यांपर्यंत नेण्यात येतात. मात्र लहान मूर्तीचं विसर्जन करुन मोठ्या मूर्ती पुन्हा मूळ मंडपाजवळ असलेल्या मंदिरात वर्षभर ठेवण्यात येतात. असाच पर्याय येत्या काळात मुंबईतील मोठ्या गणेश मंडळांना स्वीकारण्याचा पर्याय आहे.

गिरगाव पॅटर्न काय?

गिरगावात काही मंडळांनी मूर्ती मोठ्या असल्या तरी त्या शाडूच्याच असतील याची खबरदारी गेल्या काही काळापासून राबवलेली आहे. याचं कौतुकही अनेक स्तरावर करण्यात आलंय. हा पर्यायही गणेशओत्सवन मंडळांसमोर असणार आहे. मात्र यामुळे मूर्तीचं वजन वाढणार असून त्यासाठी जादा पैसेही मोजण्याची तयारी मंडळांना ठेवावी लागणार आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News