पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी गर्दीच्या वेळेत विशेष बससेवा सुरू

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आता गर्दीच्या वेळेत महिलांसाठी विशेष बस धावणार आहे. यापूर्वीच्या राखीव बसेसच्या संख्येत यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कामासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे, अशा परिस्थितीत असा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आता एक गुडन्यूज समोर येत आहे. त्यानुसार, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने गुरुवारी 12 जून 2025 पासून महिलांसाठी विशेष बससेवेच्या मार्गांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी या विशेष बस फक्त महिलांसाठी राखीव असतील आणि त्या गर्दीच्या वेळेत धावतील.

गर्दीच्या वेळेत राखीव जादा गाड्या

महिलांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी या विशेष बस फक्त महिलांसाठी राखीव असतील आणि त्या गर्दीच्या वेळेत, म्हणजेच सकाळी 8:00 ते 9:45 आणि संध्याकाळी 6:00 ते 6:40 या वेळेत धावतील. उर्वरित वेळेतील फेऱ्या सर्व प्रवाशांसाठी खुल्या असतील. या सेवेच्या माध्यमातून PMPML ने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी महिला प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महिलांसाठी विशेष बससेवा सुरू केली होती. या सेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आता या सेवेचा विस्तार करण्यात येत आहे. नवीन मार्गांची निवड डेटा-आधारित विश्लेषणाच्या आधारे करण्यात आली असून यामुळे प्रमुख निवासी क्षेत्रे, व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि वाहतूक केंद्रे यांना जोडण्यावर भर देण्यात आला आहे.

महिला सुरक्षेसाठी पाऊले उचलण्याची गरज

पुण्यातील बस प्रवासात महिलांची सुरक्षा ही एक महत्त्वाची बाब आहे. महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास अनुभव मिळावा यासाठी PMPML कडून काही पावले उचलण्यात आली आहेत, जसे की महिला कंडक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, आणि महिला आरक्षित आसनांची व्यवस्था. मात्र प्रत्यक्षात अजूनही काही समस्यांचा सामना करावा लागतो, जसे की छेडछाड, धक्काबुक्की आणि अपुऱ्या बससेवा. यासाठी प्रवासी महिलांनी सजग राहणे, गरज असल्यास तक्रार नोंदवणे आणि प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. पोलिस पेट्रोलिंग, आपत्कालीन हेल्पलाईन आणि जनजागृती मोहीम यामुळे महिलांचा बसमधील प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होऊ शकतो.


About Author

Rohit Shinde

Other Latest News