पुणे जिल्ह्यातील विकास कामांवर अर्थमंत्री अजित पवारांचे कायम लक्ष असते. आता अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर विकासकामांच्या याद्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या याद्यांमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, मॉडेल स्कूल, तलाव आणि रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने ३१ मे पर्यंत प्रशासकीय मान्यता देण्याचे आणि जून-जुलैमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
विकासकामांच्या याद्या सादर
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून लोकप्रतिनिधींकडून विकासकामांच्या याद्या देण्यात आल्या आहेत. याद्यांवर पालकमंत्री अजित पवार यांची ‘नजर’ पडल्यानंतर अंतिम स्वरूप मिळणार आहे. याद्यांमध्ये जिल्ह्यातील १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३०३ मॉडेल स्कूल, तलाव, रस्त्यांसह ‘महावितरण’च्या कामांचा समावेश आहे.

१,०९१ कोटींचा विकास आराखडा
जिल्हा नियोजन समितीची २५ एप्रिलला पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून २०२५-२६ या वर्षाचा १०९१ कोटी ४५ लाख रुपयांचा वार्षिक विकास आराखडा मंजूर मांडण्यात आला. ‘डीपीसी’ने आराखडा मंजूर केला होता. आराखड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा, सांगली जिल्ह्यात आदर्श शाळा, स्मार्ट आरोग्य केंद्रे केल्याचा राबविवेला पॅटर्न आता जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
कामांच्या याद्या लवकरच पालकमंत्री अजित पवार अंतिम करणार आहेत. अंतिम करण्यात येण्याची शक्यता आहे. या कामांची यादी प्रसिद्ध झाल्यास त्यानंतर तातडीने प्रशासकीय मान्यता मिळू शकेल.