आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 20 कोटीची तरतूद, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेरीचा तगादा या तीन कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत दिली जाते. महसूल, कृषी, गृह आणि सहकार विभागामार्फत तपासणी करून ही मदत दिली जाते.

State government – शेतकऱ्यांच्या संबंधात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकार आता पुढे सरसावले आहे. याचाच एक भाग म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी 20 कोटीची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी माहिती सांगितली आहे दरम्यान, सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण असल्याचे मानले जाते.

तीन कारणामुळे वारसाला मदत…

दरम्यान, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत करण्यासाठी विभागीय आयुक्त तथा नियंत्रक अधिकारी, कोकण यांना १२ लाख, पुणे- एक कोटी सहा लाख, नाशिक- तीन कोटी ३९ लाख, छत्रपती संभाजीनगर- चार कोटी ९२ लाख, अमरावती- सहा कोटी ७६ लाख  आणि नागपूर विभागीय आयुक्त यांना तीन कोटी ७५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

असे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले. राज्यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेरीचा तगादा या तीन कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत दिली जाते. महसूल, कृषी, गृह आणि सहकार विभागामार्फत तपासणी करून ही मदत दिली जाते.

मुंबई व मुंबई उपनगर दोन जिल्हे वगळता…

दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसास तातडीने मदत देण्यासाठी सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात उणे प्राधिकार पत्रावर निधी आहरीत करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे निधी अभावी आणि निधी मागणी प्रस्ताव पाठवून त्यास शासनाची मंजुरी घेणे या कारणास्तव मदत देण्यासाठी होणारा विलंब टाळला जाणार असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला हा २० कोटींचा निधी मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता  राज्यातील उर्वरीत जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यात येणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News