चित्रपटांची ऑनलाईन तिकिटे लवकरच महाग होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुविधा करावरील आदेश रद्द केल्यानंतर, चित्रपटगृहांना त्यांच्या ग्राहकांकडून सुविधा शुल्क आकारण्याची परवानगी मिळाली आहे, ज्यामुळे ऑनलाइन तिकिटांचे दर वाढू शकतात, यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. शिवाय, काही ग्राहक सिनेमा हॉलकडे पाठ फिरवतील अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
सुविधा करामुळे तिकिटे महागणार?
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा सुविधा कर लावण्याचा निर्णय रद्द केला आहे. याचा अर्थ असा की, चित्रपटगृहांना त्यांच्या ग्राहकांकडून तिकिटांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याची परवानगी मिळाली आहे. याचा थेट परिणाम ऑनलाइन तिकिटांवर होईल, कारण चित्रपटगृहांना आता तिकिटांच्या किमतीत सुविधा शुल्क जोडून ते विकण्याची मुभा मिळाली आहे. हे तिकिटांचे दर फक्त राज्यातच नव्हे तर देशभरातील इतर राज्यांत देखील वाढण्याची शक्यता आहे.यापूर्वी, कर्नाटक सरकारनेही चित्रपट आणि OTT सदस्यतांवर 2% उपकर (cess) लावण्याची योजना आखली होती.

कोर्टाचा सुविधा कराचा निर्णय रद्द
यापूर्वी, चित्रपट, नाटकं किंवा इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या ऑनलाइन तिकिटांवर मनोरंजन कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे सुविधा शुल्क, चित्रपटगृहांना त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि खर्च भरून काढण्यासाठी वापरले जाईल. आगामी काळात हे तिकिटांचे दर वाढल्यास ग्राहक सिनेमा गृहाकडे अथवा ऑनलाईन तिकिट बुकींगकडे पाठ फिरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.