महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनि शिंगणापूर देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. इथे देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चौकशी समितीच्या अहवालातून हे भीषण वास्तव उघड झाले आहे. देवस्थानच्या कारभारात 2447 बोगस कर्मचारी दाखवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्व बाबी सभागृहासमोर मांडल्या आहेत. तसेच घोटाळेबाजांना सोडणार नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
“घोटाळे करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई”
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सायबर पोलीस याचा तपास करत आहेत. धस यांनी आणखी एक आरोप केला असून त्यांनी म्हटले आहे की, बोर्डाचे ट्रस्टी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर महिन्याला 10 ते 20 कोटींची संपत्ती विकत घेतल्याची बाब पुढे येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की ” देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, जे ट्रस्टी लोकसेवक या संज्ञेत येत असतील त्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल.” शिवाय फौजदारी गुन्हे दाखल करून घोटाळेबाजांवर कारवाई करणार असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

Criminal Offence will be registered against the trustees involved in the Shani Shingnapur scam. Misuse of Faith for corruption will not be tolerated.
शनि शिंगणापुर येथील शनि मंदिराच्या विश्वस्थांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करून देवाच्या नावाने भ्रष्टाचार… pic.twitter.com/ra4tgmtxGR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2025
बोगस अॅप; आणि कोट्यवधींचा घोटाळा
आमदार विठ्ठल लंघे आणि आमदार सुरेश धस यांनी नकली ॲप तयार करून भाविकांकडून पूजेसाठी त्यावर पैसे घेतले जात असल्याचा प्रकारही सभागृहात उपस्थित केला होता. धस यांनी आरोप केला की या अॅपच्या माध्यमातून किमान 500 कोटींची रक्कम गोळा करण्यात आली आहे.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चौकशी समितीच्या, कागदोपत्री दाखवलेल्या एकूण 2474 कर्मचाऱ्यांपैकी कोणाचे मस्टर सापडले नाही, त्यांचा हजेरीपटही नव्हता आणि कोणाची सही देखील नव्हती. घोटाळेबाजांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाच बँक खाती उघडायला लावली होती. मंदिराच्या खात्यातून अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार मिळत होता. पगाराची रक्कम प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या खात्यात जात होती.
देवस्थान आतापर्यंत 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होते. मात्र घोटाळेबाजांनी कागदोपत्री 2447 कर्मचारी नियुक्त केल्याचे दाखवले. हे सर्व कर्मचारी बोगस होते. देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखवले होते. प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता. 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असे दाखवले असताना, प्रत्यक्षात केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी हजर होते. अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले होते.