पायाच्या बोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, वापरून बघाच…

काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमच्या पायाच्या बोटांवरील काळा थर काढू शकता आणि स्वच्छ, चमकदार त्वचा मिळवू शकता.

धूळ आणि घामामुळे पायाची बोटे काळी पडणे सामान्य आहे. पण जर त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ते त्वचेचे सौंदर्य बिघडवते. विशेषतः महिलांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या बोटांचा काळेपणा दूर करायचा असेल तर पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही सोप्या आणि घरगुती गोष्टी आहेत ज्या या गोठलेल्या थराला हळूवारपणे स्वच्छ करतात आणि नैसर्गिक पद्धतीने त्वचा चमकदार बनवतात.

बेकिंग सोडा आणि लिंबू

बेकिंग सोडा आणि लिंबू वापरून पायाच्या बोटांवरील काळा थर काढता येतो. बेकिंग सोडा आणि लिंबू एकत्र मिसळून तयार केलेले मिश्रण पायांना लावल्यास त्वचेवरील काळा थर कमी होतो.
  • एका वाटीत 2-3 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात पुरेसे लिंबाचा रस टाका.
  • तयार मिश्रण पायाच्या बोटांवरील काळ्या भागावर लावा.
  • 5-10 मिनिटे मिश्रण बोटांवर चोळा.
  • मिश्रण 15-20 मिनिटे तसेच ठेवून द्या.
  • नंतर पाण्याने पाय स्वच्छ धुवा.

हळद आणि बेसन

हळद आणि बेसन वापरून पायाच्या बोटांवरील काळा थर काढता येतो. हळद आणि बेसन एकत्र करून तयार केलेले मिश्रण त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करते. 

  • एका वाटीत बेसन, हळद आणि दूध मिक्स करा.
  • आवश्यक असल्यास थोडे गुलाबजल घालून पेस्ट तयार करा.
  • तयार मिश्रण पायाच्या बोटांवर लावा.
  • हलक्या हाताने 5-10 मिनिटे मसाज करा.
  • 15-20 मिनिटे तसेच ठेवा.
  • नंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवा.

 लिंबू आणि साखरेचा स्क्रब

पायाच्या बोटांवरील काळा थर काढण्यासाठी लिंबू आणि साखरेचा स्क्रब एक चांगला घरगुती उपाय आहे. लिंबातील ऍसिड आणि साखरेचे स्क्रब एकत्रितपणे डेड स्किन काढण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होते. 

  • लिंबू कापून त्याचे दोन भाग करा.
  • एका लिंबाच्या भागावर साखर घ्या.
  • या भागाला बोटांवर आणि पायाच्या इतर भागांवर हलक्या हाताने चोळा.
  • 5-10 मिनिटे स्क्रब करा.
  • नंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवा.

बटाटा आणि लिंबाचा रस

 बटाटा आणि लिंबाचा रस वापरून पायाच्या बोटांवरील काळा थर काढता येतो. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, तर लिंबू त्वचेवरील डाग आणि टॅनिंग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र वापरल्याने पायांची त्वचा उजळण्यास मदत होते. 

  • एक बटाटा किसून त्याचा रस काढा.
  • लिंबू पिळून त्याचा रस घ्या.
  • बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात घ्या आणि एकत्र मिसळा.
  • हे मिश्रण पायांच्या बोटांवर आणि इतर काळ्या झालेल्या भागांवर लावा.
  • मिश्रण 15-20 मिनिटे तसेच ठेवा.
  • नंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवा.
  •  हा उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत  नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News