Sabudana Cutlet Marathi Recipe: कटलेट हा असा पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानांच आवडतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्स खात असतो. त्यातीलच एक म्हणजे साबुदाणा कटलेट होय. साबुदाणा कटलेट चवीला तर उत्तम असतोच, पण तो बनवायलाही एकदम सोपा असतो. आज आपण साबुदाणा कटलेट्ची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया…

साबुदाणा कटलेटसाठी साहित्य-
२ कप साबुदाणा
४ उकडलेले बटाटे
१/२ कप शेंगदाणे
१ हिरवी मिरची चिरलेली
१ टीस्पून किसलेले आले
चवीनुसार मीठ
१/२ टीस्पून लाल मिरची पावडर
१/२ टीस्पून आमचूर पावडर
१ टीस्पून जिरे
आवश्यकतेनुसार कोथिंबीर
साबुदाणा कटलेट्ची रेसिपी-
साबुदाणा कटलेट बनवण्यासाठी, साबुदाणा रात्रभर भिजत ठेवा. एका भांड्यात साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि वरील सर्व मसाले मिसळून पीठ तयार करा आणि ते गोल करा.
साबुदाण्याचे गोळे कटलेटच्या आकाराचे करा. सर्व कटलेट त्याच प्रकारे तयार करा आणि एका प्लेटमध्ये ठेवा.
कढईमध्ये तेल गरम करा आणि कटलेट तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
साबुदाणा कटलेट तयार आहे. कटलेट टिश्यू पेपरवर काढा.
साबुदाणा कटलेट एका प्लेटमध्ये ठेवा आणि कोथिंबीर किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.