रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवास करण्याआधी जाणून घ्या नियोजन

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस कटकटीचा असतो. कारण दर रविवारी उपनगरीय मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जात असतो.

रविवारचा मेगाब्लॉक मुंबई आणि उपनगरांतील रहिवाशांसाठी नेहमीचा डोकेदुखी ठरत असतो. आता रविवारी म्हणजेच उद्या 22 जूनला देखील ब्लॉक असणार आहे. रविवारी मध्य रेल्वेवर नेहमीप्रमाणे दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर या रविवारी दिवसाचा ब्लॉक असणार नाही. ब्लॉक काळात लोकल कमी असल्याने गर्दी होणार असल्याने नियोजन करूनच प्रवासाला लवकर निघावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस कटकटीचा असतो. कारण दर रविवारी उपनगरीय मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जात असतो. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ या स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसाचा ब्लॉक घेतला जाणार नाही. येथे नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात लोकल कमी असल्याने गर्दी होणार असल्याने नियोजन करूनच प्रवासाला लवकर निघावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मेगाब्लॉकचे नियोजन कसे असेल?

सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान, अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी १५.२८ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी,मुंबई येथून सकाळी १०.३७ ते दुपारी १५.४५ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील.

तसेच, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई – मानखुर्द आणि पनवेल – नेरुळ/ठाणे दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्स-हार्बर लाईन / मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. बोरीवली आणि भाईंदर स्थानकांच्या दरम्यान शनिवारी रात्री ( दि. २१ आणि २२ च्या मध्यरात्री ) अप जलद मार्गावर रात्री ११.१५ ते मध्यरात्री २.४५ वा आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १२.४५ ते सकाळी ०४.१५ वाजताच्या दरम्यान नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात विरार/वसई रोड ते बोरीवली दरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येतील.या संदर्भातील विस्तृत माहीती संबंधित स्थानकाच्या स्टेशन मास्तरांकडे पाहायला मिळेल.

प्रवाशांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

अशावेळी नोकरदांराना अथवा अन्य व्यक्तींना अधिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News