नवी दिल्ली- जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं 22 जून रोजी रोबोटॅक्सी लाँच केलीय. ही अशी टॅक्सी आहे की ज्यातून विना ड्रायव्हर प्रवास करता येणं शक्य होणार आहे.
टेस्ला कंपनीच्या या रोबोटॅक्सीतून फेरीची किंमत 4.20 डॉलर्स म्हणजेच 364 रुपे इतकी असणार आहे. सध्या ही टॅक्सी सेवा केवळ ऑस्टिन शहरातच उपलब्ध आहे. सध्या ही टॅक्सी सेवा काही गुंतवणूकदार आणि कन्टेन्ट क्रिएटर्ससाठीच उपलब्ध करुन देण्यात आली असून या फेरीचा अनुभव अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

10 वर्षांच्या मेहनतीचा परिणाम, मस्क काय म्हणाले?
एलन मस्क यांनी एक्सवर याबाबत पोस्ट लिहिली आहे, त्यात त्यांनी लिहिलंय की, एस्टा एआय सॉफ्टवेअर आणि चीप डिझाईन टीमचं रोबोटॅक्सीच्या यशस्वी लाँचसाठी अभिनंदन. गेल्या 10 वर्षांच्या कष्टाचं हे फळ आहे. टेस्लाच्या टीमनं बाहेरुन कोणत्याही कंपनीच्या मदतीशिवाय ही एआय चीप आणि सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय. सेंसर, कॅमेरे, रडार आणि लिडार सारख्या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत ही टॅक्सी रस्त्यावर नेव्हिगेशन करते.
सध्या फक्त 20 टॅक्सींची सेवा उपलब्ध
टेस्ला मॉडेल वायचा या टॅक्सी सर्विहससाठी वापर करण्यात येत असून त्यावर रोबोटॅक्सी असं लिहिण्यात आलंय. सध्या टेस्लानं अशा 20 टॅक्सी रस्त्यावर उतरवल्या आहेत. सुरक्षेसाठी सध्या कंपनीचा एक कर्मचारी या टॅक्सीत प्रवाशांसोबत प्रवास करतोय. दपर्घटना घडलीच तर कारवर नियंत्रण आणण्याचं काम हा कर्मचारी करणार आहे. ऑस्टिन शहरात सकाळी सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत या टॅक्सी सेवेचा लाभ घेता येतोय.
सर्वसामान्यांनी सवकरच खुली करणार
रोबोटॅक्सी सर्वसामान्यांसाठी कधी खुली होणार याबाबत टेस्ला कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच रोबोटॅक्सी सेवेचा विस्तार करणार असल्याचं आणि इतरही शहरांत ही सेवा उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन एलन मस्क यांनी दिलंय.