१२ दिवसांच्या संघर्षानंतर इस्त्रायल-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

ही युद्धबंदी पुढील २४ तासांत टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. पश्चिम आशियातील या दोन राष्ट्रातील संघर्षाचे '१२ दिवसांचे युद्ध' असे ट्रम्प यांनी वर्णन केले आहे.

Israel-Iran Ceasefire : संपूर्ण जगाचे लक्ष  इस्त्रायल आणि इराण यांच्या युद्धाकडे लागले होते. अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले होते. त्यामुळं तिसऱ्या युद्धाचा भडका उडतोय का, अशी भीती सर्वांना होती. मात्र तब्बल १२ १२ दिवसांच्या संघर्षानंतर इस्त्रायल-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘पूर्ण व संपूर्ण युद्धबंदी’ झाली, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

युद्धबंदी पुढील २४ तासांत लागू

दरम्यान, सोमवारी इस्त्रायल-इराणमधील युद्ध थांबविण्यात आले आहे, या दोन देशांतील युद्धाला आता पूर्णविराम मिळाल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मध्यस्थी’नंतर युद्ध थांबले आहे. तसेच ही युद्धबंदी पुढील २४ तासांत टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. पश्चिम आशियातील या दोन राष्ट्रातील संघर्षाचे ‘१२ दिवसांचे युद्ध’ असे ट्रम्प यांनी वर्णन केले आहे.

इस्रायल-इराणच्या युद्धात अमेरिकेचा सहभाग…

सुरुवातीला इस्रायलने इराणच्या लष्कर हवाई हल्ला केला. यामुळं युद्ध पेटले होते. इराणनेही इस्रायलवर ड्रोन ह्ल्ले करत जशात तसे प्रतिउत्तर दिले. तर अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर तणाव आणखी चिघळला होता. पण १२ दिवसांनंतर हे युद्ध थांबल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की, ‘सर्वांचे अभिनंदन! इस्रायल व इराण यांच्यात ‘पूर्ण आणि संपूर्ण युद्धबंदी’ असं पोस्टमध्ये म्हटले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News