इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम, पेट्रोल 120 रुपये लिटरवर पोहचण्याची शक्यता

इराण-इस्रायल युद्धामुळे आपल्या देशात महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोलचे भाव 120 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- इस्रायल आणि इराणच्या युद्धात अमेरिकेनंही उडी घेतल्यानंतर आता तिसऱ्या महायुद्धाचे ढग जगावर जमा होऊ लागले आहेत. इराणवर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली आहे, त्यातच इस्रायलपाठोपाठ अमेरिकेनंही इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांच्या ठिकाणी हल्ले केल्यानंतर वातावरण आणखी तापलंय.

या सगळ्याचे परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे देशात महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोलचे भाव 120 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

पेट्रोलचे दर का वाढणार?

अमेरिकनं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणच्या संसदेनं स्ट्रेट ऑफ होर्म्युज बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. स्ट्रेट ऑफ होर्म्युज बंद झाला तर त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेल व्यापाराचा हा महत्त्वाचा मार्ग असल्यानं हा मार्ग बंद झाल्यास त्याचा थेट परिणाम भआरतावर होणार आहे.

क्रूड ऑईलच्या किमती 80 डॉलर्सवर

इराणच्या संसदेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर क्रूड ऑईलच्या किमती 80 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहचल्या आहेत. भारत त्याच्या इंधनाच्या गरजेपैकी मोठ्या गरजेचं इंधन आयात करतो. जर क्रूड ऑईलच्या किमतीत या युद्धामुळे भडकल्या तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती महागण्याची शक्यता आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुज का महत्त्वाचा?

स्ट्रेट ऑफ होर्मुज हा अरुंद समुद्री मार्ग आहे. हा मार्ग फारस खाडीला ओमानच्या खाडीशी आणि अरब समुद्राशी जोडतो. हा मार्ग केवळ 33 किलोमीटर रुंद आहे. मात्र या समुद्री मार्गावरुन जगातील 20 ते 25 टक्के कच्चं तेड आणि 25 टक्के नॅचरल गॅस याच मार्गातून जातो.

सौदी अरब, इराक, कुवैत, करात या देशांतून तेलाचे भरलेले टँकर याच मार्गे जगभरात जातात. भारतासाठी आयात करण्यात येणारं 40 टक्के तेलंही याच मार्गे आयात करण्यात येतं. हा मार्ग जर बंद झाला तर भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

हा रस्ता बंद झाला तर तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत 30 ते 50 टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञ सांगतायेत. 80 डॉलर्सवर असलेले कच्च्या तेलाचे प्रति बॅरलचे दर 120 ते 150 डॉलर्सवर पोहचण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पेट्रोल भारतात 120 रुपये प्रतिलिटर होऊ शकते.


About Author

Smita Gangurde

Other Latest News