एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू, नवीन परिपत्रकात काय म्हटलेय?

एकंदर प्रवाशांना योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या हॉटेल थांब्याची निवड करावी, तसेच त्यातून एसटी महामंडळाचा महसूल देखील वाढवा अशा दुहेरी उद्देशाने नवे हॉटेल- मोटेल धोरण एसटी महामंडळाने जारी केले आहे.

ST Mahamandal : लालपरी अर्थात एसटीबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील अनेक एसटी डेपोत मोठी घाण आणि दुर्गंधी असते. तसेच डेपो खूप अस्वच्छ असतात. दरम्यान, परिवहन महामंडळाने संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे. एसटी महामंडळाने त्वरित एक परिपत्रक काढून हे नवीन नियमावली जारी केली आहे. दोन दिवसापूर्वी मत्री सरनाईक हे पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली. तेथे प्रवाशांच्या सोयी-सुविधा बाबत नाराजी व्यक्त केली होती.

हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता

दरम्यान, हॉटेल थांब्याची निवड करताना तेथील स्वच्छता, अन्नपदार्थ दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्याने विचार केला जावा, असे देखील निविदा प्रक्रियेत नमूद केले जाणार आहे. विशेष म्हणजे यापुढे नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देण्यात येणार आहे. ती ३ वर्षासाठी दिली जाईल परंतु १ वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरील सेवा- सुविधाचा फेर आढावा घेऊन पुढील २ वर्षीच्या मुदतवाढीबाबत विचार केला जाणार आहे.

…तर एफआयआर देखील दाखल होणार

वस्तुस्थितीजन्य अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी दिली जाणार आहे. या हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे भविष्यात या हॉटेल थांब्या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन कडक कारवाई करण्यात येणारा आहे. तसेच संबंधित हॉटेल तामिनी महामंडळाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल केला जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News