DCM Eknath Shinde – गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठा विमान अपघात घडला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. आज पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथे जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच जखमींची विचारपूस केली. या घटनेत अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना, अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य आणि मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. आज त्यांनी ठाण्यात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
सर्वात मोठी दुर्देवी वेदनादाई दुःखद घटना..
दरम्यान, पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, या अपघातात विमान प्रवासी मोठ्या प्रमाणात मृत्यू मुखी पडले आहेत….देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सर्वजण पोहचून आढावा घेतला आहे….अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे… महाराष्ट्रातील काही प्रवासी त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. ज्या डेड बॉडी आहेत. ओळखणे कठीण झाले आहेत.. डिएनए टेस्ट आणि फॉरेन्सिक टेस्टचे काम सुरू आहे, असं एकनाथ शिंदेंन माहिती दिली.

मुख्यमंत्री स्वतः गांभीर्याने लक्ष ठेऊन…
या घटनेमुळं देश हादरला आहे. घरातील व्यक्ती गेल्यामुळं नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केंद्र सरकार आणि गुजरात सरकार मृत्यांच्या कुटुंबाचा संपर्कात आहे. या घटनेतील महाराष्ट्रातील प्रवाशी होते, अशीही माहिती मिळतेय, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने जे काय सहकार्य पाहिजे ते देत आहे. मुख्यमंत्री स्वतः गांभीर्याने लक्ष ठेऊन आहेत. महाराष्ट्रामधील जे लोकं आहेत, त्यांना देखील महाराष्ट्र सरकार सहकार्य करणार आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.