CM Devendra Fadnavis : यावर्षी नुकताच प्रयागराज येथे कुंभमेळा पार पडला. यानंतर नाशिक येथे होणाऱ्या आगामी २०१७ सालच्या कुंभमेळ्याचे वेध भाविकांना लागले आहेत. भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत घेण्यात आला. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र शासन यांच्यात बैठक पार पडली.
नाशिकला जोडणारे महत्त्वाचे ८ मार्गाचा विकास होणार…
कुंभमेळाप्रती भाविकांची वाढती आस्था व होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती. नाशिकला जवळपास महत्त्वाचे ८ मार्ग येतात. हे सर्व मार्ग कुंभच्या काळामध्ये महत्त्वाचे आहेत. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे.

या मार्गाचा होणार विकास
१) घोटी – पाहिने – त्रिंबकेश्वर – जव्हार फाटा
२) द्वारका सर्कल – सिन्नर आयसी २१ (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे – कोल्हार
३) नाशिक ते कसारा
४) सावली विहीर (आय सी २० समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द)
५) नाशिक ते धुळे
६) त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
७) सावली विहीर – मनमाड – मालेगाव
८) घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
९) शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)