आजपासून ‘वारी’ च्या वाटेवरील गावांमध्ये मद्य-मांस विक्री बंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरु

Ashadi Waari – पंढरपूरची वारी हे भक्तांसाठी एक पर्वणी असते. वारी करण म्हणजे जन्माला आल्याचे सार्थक होणे, अशी भावना भक्तामध्ये आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटले जाते. पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. दरम्यान, आता पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध विठ्ठल भक्तांना लागले आहेत. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून पालख्या आणि दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत.

आचार्य तुषार भोसलेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

दरम्यान, 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. तसेच पालखी सोहळा, रिंगण ज्या मार्गाने जातील त्या गावांमध्ये तो संपूर्ण दिवस मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात यावी, यात्रा कालावधीत पंढरपूर परिक्षेत्रात मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात यावी आणि व्हीआयपी वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशा तीन मागण्या भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या.

कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दुसरीकडे भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे ज्या तीन मागण्या केल्या होत्या. त्या तात्काळ मान्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता प्रशासनाने आजपासून अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळं पालखी सोहळा, रिंगण ज्या मार्गाने जाणार आहेत. तिथून संपूर्ण दिवस मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात आली आहे.

माऊलींच्या पालखीचा मार्ग कसा असणार?

– 24 तारखेला पुन्हा सासवड होऊन जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ
– 25 तारखेला पालखी वाल्हे येथे माऊलींच्या पादुकांना निरास्नान
– 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचा लिंब येथे माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण
– 1 जुलै नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण
– 2 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण
– 3 जुलै रोजी वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण
– 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावाची विहीर याठिकाणी होईल
– 5 जुलै रोजी पालखी वाखरी येथे मुक्कामी
– 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल


About Author

Astha Sutar

Other Latest News