Ramayana Movie : नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या पौराणिक चित्रपट ‘रामायण’ची तयारी जोरात सुरू आहे. रणबीर कपूर स्टारर या चित्रपटात बॉलिवूडपासून ते साउथच सिनेमातील अनेक मोठे कलाकार झळकणार आहेत. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
ही अभिनेत्री साउथ सिनेमातील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ती बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटात मंदोदरीची भूमिका साकारणार आहे, जी रावणाची पत्नी होती. विशेष म्हणजे, ती याच वर्षी एका बॉलिवूड सुपरस्टारच्या चित्रपटात झळकली होती.
रामायण‘मध्ये या अभिनेत्रीची एंट्री
जर तुम्ही अजूनही अंदाज लावू शकले नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर काजल अग्रवाल आहे. ‘सिकंदर’मध्ये झळकलेली काजल अग्रवाल हिला नितेश तिवारी यांनी ‘रामायण’मध्ये मंदोदरीच्या भूमिकेसाठी कास्ट केले आहे. तिचा लुक टेस्टही पूर्ण झाला आहे.
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, काजल अग्रवालने गेल्याच आठवड्यात आपला लुक टेस्ट केला होता आणि ती मंदोदरीच्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. इतकेच नाही, तर तिने अलीकडेच शूटिंगलाही सुरुवात केली आहे. सध्या निर्माते रावणाच्या लंकेशी संबंधित भागाचे शूटिंग करत आहेत.
सीताच्या भुमिकेत साई पल्लवी
रामायण ही भारतातील सर्वात जास्त प्रतिक्षित फिल्म आहे जी पॅन-इंडिया स्तरावर बनवली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत, तर निर्मिती नमित मल्होत्रा करत आहेत. KGF चा यश देखील या चित्रपटाचा सह-निर्माता आहे. भगवान रामाची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे, तर सीतेची भूमिका साई पल्लवी करत आहे. त्याचबरोबर सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
रामायण दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. २०२६ च्या दिवाळीत पहिला भाग रिलीज केला जाईल आणि २०२७ च्या दिवाळीत दुसरा भाग सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल. रिपोर्ट्सनुसार, पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झाले आहे. सध्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू आहे.