मृत्यूनंतर व्यक्तीचे आधार आणि पॅन कार्ड कसे बंद करावे? सोप्या भाषेत समजून घ्या

मृत व्यक्तीची ओळख वापरून भविष्यात गैरवापर होऊ नये म्हणून आधार आणि पॅन कार्ड निष्क्रिय करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया आता ऑनलाइनसुद्धा करता येते, ज्यामुळे तुम्ही घरी बसूनच ती पूर्ण करू शकता.

Cancel PAN & Aadhaar After Death : व्यक्ती जिवंत असताना त्याच्याकडे अनेक कागदपत्रे असतात, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्यांचा वापर दैनंदिन व्यवहारांमध्ये होतो. पण जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा बहुतांश वेळा कुटुंबीय त्याचे आधार, पॅन यांसारखी कागदपत्रे फक्त सांभाळून ठेवतात. मात्र, जबाबदारी इथेच संपत नाही.

मृत व्यक्तीची ओळख वापरून भविष्यात गैरवापर होऊ नये म्हणून आधार आणि पॅन कार्ड निष्क्रिय करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया आता ऑनलाइनसुद्धा करता येते, ज्यामुळे तुम्ही घरी बसूनच ती पूर्ण करू शकता.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की व्यक्तीच्या मृत्यूनंतर किमान त्याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड रद्द करून घ्यायला हवे, कारण त्याच्या गैरवापराचा धोका असतो. गुन्हेगार अनेक वेळा अशा कागदपत्रांचा वापर फसवणूक किंवा आर्थिक व्यवहारांसाठी करू शकतात.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पॅन आणि आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने रद्द करता येते. कसे? चला, जाणून घेऊया.

कोणताही पॅन कार्ड त्याच्या अधिकृत एक्सपायरी डेटपर्यंत वैध असतो. जर एखाद्या व्यक्तीचे अचानक निधन झाले, तर त्याचा पॅन कार्ड रद्द करून घ्यायला हवा. जर असे केले नाही, तर कोणीही त्या पॅन कार्डचा वापर करून बँक अकाउंट उघडू शकतो, किंवा चुकीच्या पद्धतीने लोन घेऊ शकतो.

पॅन कार्ड रद्द करण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत.
ऑफलाइन पद्धतीत एक अर्ज दिला जातो. या अर्जात मृत व्यक्तीचे संपूर्ण नाव, मृत्यूची तारीख, पॅन कार्ड रद्द करण्याचे कारण आणि जो व्यक्ती पॅन कार्ड रद्द करत आहे त्याची माहिती (जसे की मृत व्यक्तीचा मुलगा किंवा पत्नी) लिहावी लागते.

त्याचबरोबर काही महत्त्वाचे कागदपत्रे जोडावी लागतात, जसे की मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate). हा अर्ज इनकम टॅक्स विभागाच्या AO (Assessing Officer) कडे सादर करावा लागतो. AO ची माहिती इनकम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टल वरून मिळू शकते.

NSDL वेबसाइटला भेट द्या

जर तुम्हाला हे काम ऑनलाइन करायचे असेल, तर तुम्हाला Form 49A भरावा लागेल, जो NSDL च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

  • त्या वेबसाइटवर जाऊन PAN Correction Application या पर्यायावर क्लिक करावं.
  • तिथे तुम्ही PAN रद्द करण्याची विनंती (Cancel PAN Request) देऊ शकता.
  • त्यानंतर, संबंधित सर्व कागदपत्रं (उदा. मृत्यू प्रमाणपत्र, नातेसंबंधाचे पुरावे इत्यादी) जवळच्या NSDL PAN सेवा केंद्रात (PAN Service Center) जमा करावी लागतील.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर, संबंधित पॅन कार्ड रद्द करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाते.

मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड कसे रद्द करावे

दरम्यान, आधार कार्ड रद्द करण्याचा सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही. मात्र, तुम्ही मृत व्यक्तीचा बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकता. बायोमेट्रिक डेटा लॉक केल्यास मृत व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स, आयरिस स्कॅन इत्यादींचा गैरवापर होऊ शकत नाही.

बायोमेट्रिक डेटा लॉक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे SMS च्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता. त्यासाठी, मृत व्यक्तीच्या रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवरून १९४७ या क्रमांकावर SMS पाठवावा लागतो.
SMS मध्ये टाईप करा- GETOTP आणि त्यानंतर एक स्पेस देऊन आधार क्रमांकाचे शेवटचे ४ अंक लिहा.

उदा. – GETOTP 1234
यानंतर पुढील सूचना SMS द्वारे मिळतील, ज्यामुळे बायोमेट्रिक डेटा लॉक केला जाऊ शकतो

OTP मिळाल्यानंतर, या स्वरूपात दुसरा एसएमएस पाठवा – LOCKUID < आधारचे शेवटचे ४ अंक> <६ अंकी OTP>

तुम्ही हे काम UIDAI वेबसाइटवर देखील करू शकता. वेबसाइटवर जा आणि लॉग इन करा.

माझा आधार विभागात जा आणि लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्स निवडा.

तिथे पुन्हा आधार क्रमांक टाका आणि OTP वापरून पडताळणी करा.

शेवटी लॉक बायोमेट्रिक्स वर क्लिक करा.

असे करणे का गरजेचे आहे?

अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोणासोबत आणि कधी सायबर गुन्हा घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. जर एखाद्या मृत व्यक्तीच्या आधार किंवा पॅन कार्डाचा वापर फसवणुकीसाठी झाला, तर त्याच्या कुटुंबीयांसाठी परिस्थिती हाताळणे खूपच कठीण होईल. त्यामुळे गरज आहे की वेळेतच हे डॉक्युमेंट्स रद्द करून सुरक्षित ठेवावेत.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News