वानखेडे क्रिकेटची पंढरी, भविष्यात भव्य दिव्य क्रिकेट स्टेडियम उभा करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई क्रिकेट असोसिएशनकरता 1 लाख प्रेक्षकांची क्षमता सामावणा-या स्टेडियमसाठी जागा देण्याची राज्य सरकारची तयारी आहे. पुढील चार वर्षांत मुंबई क्रिकेट असोसिएशन आपली 100 वर्ष पूर्ण करतंय, त्यापूर्वी स्टेडियम उभारण्याची एमसीएनं तयारी करावी, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडेवर घोषणा केली आहे.

Wankhede Stedium – मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानले जाते. इथे मोठमोठे अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत आणि जरी लॉर्ड्स मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हणत असले तरी मुंबई आणि वानखेडे हेच खऱ्या अर्थाने क्रिकेटची पंढरी आहे. आणि पंढरीतला देव म्हणजे सचिन तेंडुलकर आज त्याचा पुतळा ही इथे उभा आहे. यानंतर आता शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्मा यांचे क्रिकेट स्टेडियमच्या स्टँडला नाव देण्यात आले त्याचे उद्घाटन झाले. सोबत एमसीएचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अमोल काळे यांचं नाव एमसीए लाऊंजच्या विशेष बॉक्सला देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

पवारांचे क्रिकेटमध्ये मोठे योगदान…

दरम्यान पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शरद पवार आयसीआयसीचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यानी मोठे क्रिकेटसाठी काम केले. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ते बीसीसीआयमध्ये पण होते. त्यामुळे त्यांचे इथे क्रिकेट स्टेडियमला नाव दिल्यामुळे त्यांचा एक प्रकारे एमसीएने आदर केलेला आहे. पवार साहेब यांचे सामाजिक आणि राजकारण क्षेत्रात जसे काम आहे, तसे क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांचाही इथे क्रिकेट स्टेडियमच्या स्टॅन्डला नाव दिल्यामुळे सन्मान झाला असल्याचा मुख्यमंत्री म्हणाले.

दिग्गजाच्या पंक्तीत रोहित शर्मा…

वानखेडे स्टेडियम हे मोठे आहे आणि क्रिकेटप्रेमी आज इथे मोठ्या प्रमाणात जमले आहेत. अजित वाडेकर यांनी भारताला जिंकायची सवय लावून दिली. 1971 मध्ये त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवून दिला. तेव्हापासून भारताला जिंकायची सवय लागली. भलेही उशिरा का असेना पण त्यांच्या कुटुंबांना एक सन्मान मिळाला… मान मिळाला… तसेच रोहित शर्मा यांचा खेळ जबरदस्त आहे.

त्यांनी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमध्ये आपले चमक दाखवली आहे आणि त्यांचा एवढा खेळ अप्रतिम आहे की ते दिग्गजांच्या पंक्तीत केव्हा जाऊन बसले हे काय समजलेच नाही. MCA चांगलं काम करत आहे. पण त्यांनी एक आणखी क्रिकेट स्टेडियम व्हावं असं ते विचारात आहेत. जर असा प्रस्ताव आणला तर नक्कीच वानखेडे स्टेमसारखे आणखी एक आपण मैदान तयार करू, अशी ग्वाही यावेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


About Author

Astha Sutar

Other Latest News