सीएसएमटी रेल्वे स्थानकात महाराजांचा भव्य-दिव्य अश्वारुढ पुतळा बसवणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

तो प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी केंद्राकडे आहे. पण निश्चितच या प्रस्तावासाठी आम्ही पाठपुरावा करू... त्यामुळे तेही पूर्ण होईल, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis : शिवप्रेमीसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. आता मुंबईतील महत्वाचे सीएसएमटी (CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) या रेल्वे स्थानकात आता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य-दिव्य अश्वारुढ पुतळा बसवण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. त्यामुळं शिवप्रेमीतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारने शिवरायांचा पुतळा बसवावा…

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकात महारांचा पुतळा व्हावा, यासाठी स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिले. पण याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी माझी विनंती आहे, असं आमदार भास्कर जाधव म्हणाले. व मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचं नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र द्यावे. आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात केली.

CSMT स्टेशनचा विस्तार करणार… 

सीएसएमटी रेल्वे स्थानक आयकॉनिक स्टेशन करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. हे स्टेशन आणि तेथील परिसर हा भव्य-दिव्य होणार आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील बसविण्यात येणार आहे. हे सरकारच्या विचाराधीन आहे. हे मी या निमित्ताने सांगतो. त्यामुळे याबाबत कोणताही प्रस्ताव पुन्हा मांडण्याची गरज नाही.

आणि दुसरे म्हणजे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिंदे सरकारच्या काळातच बनवला गेला. हा प्रस्ताव राज्याने मंजूर करुन प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News