Places 100 km from Pune: तुम्ही पुण्यात राहत असाल पण शहरापासून दूर थोडी ताजी हवा घ्यायची असेल, तर तुम्ही पुण्याभोवती १०० किलोमीटरच्या आत भेट देण्यासाठी काही सर्वोत्तम ठिकाणांची यादी नक्की पहा. ही ठिकाणे पुण्यापासून १०० किमी अंतरावर आहेत आणि शहरातून एका दिवसाच्या सहलीला भेट देण्यासाठी योग्य आहेत.
आपल्याला माहित आहे की, जीवन कधीकधी कंटाळवाणे आणि निरुत्साही वाटते म्हणून जीवनात थोडा उत्साह आणा आणि आजच या अनोख्या आणि मनोरंजक ठिकाणांना भेट द्या. या ठिकाणांना भेट देणे मोठ्यांसोबत मुलांनासुद्धा नक्की आवडेल. चला तर मग पाहूया ठिकाणांची नावे…

सिंहगड किल्ला –
सिंहगड किल्ला पुण्यापासून ३२ किमी अंतरावर आहे. तिथे पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग – कारने, पुण्यापासून सुमारे एक तास लागतो किंवा तुम्ही बसने देखील जाऊ शकता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत भेट देण्याची सर्वोत्तम वेळ समजली जाते. विशेषतः जर तुमची मुले असतील आणि त्यांना किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा उत्तम पर्याय आहे. १६७१ मध्ये झालेल्या सिंहगडच्या लढाईवरून किल्याचे नाव ठेवण्यात आले. हा सुंदर किल्ला सुमारे २००० वर्षे जुना आहे.
पवना तलाव-
पुणे शहराच्या परिसरात असलेले पवना तलाव हे कोणत्याही पर्यटकाला मंत्रमुग्ध करणारे ठिकाण आहे. विशेषतः पावसाळ्यात या तलावाचे सौंदर्य शिगेला पोहोचते. निसर्गप्रेमी आणि शांती शोधणाऱ्यांसाठी पवना तलाव स्वर्गापेक्षा कमी नाही. पावसाळ्यात बरेच लोक येथे लॉन्ग ड्राईव्हवर जातात. उन्हाळ्यातसुद्धा अनेक कुटुंबे येथे पिकनिक साजरी करण्यासाठी येतात. विशेषतः ज्यांना कॅम्पिंगची आवड आहे ते पर्यटक तलावाच्या किनाऱ्यांना सर्वाधिक भेट देतात. पुण्यापासून अवघ्या ५० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
लोणावळा-खंडाळा-
भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन लोणावळा हे पुण्यापासून फक्त ६५ किलोमीटर अंतरावर आहे. या हंगामात तुम्ही आठवड्याच्या शेवटी लोणावळा किंवा खंडाळा येथे नक्कीच सहल करावी. पुण्याहून तुम्ही फक्त एका तासात लोणावळा येथे पोहोचू शकता.
लवासा-
लवासा हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे एकदा भेट देणारा पुन्हा नक्की येतो. त्याच्या सौंदर्यामुळे, ते निसर्गप्रेमी आणि गर्दीपासून दूर एकांत शोधणाऱ्या पर्यटकांसाठी स्वर्ग मानले जाते. लवासा हे एक उत्कृष्ट हिल स्टेशन म्हणूनही ओळखले जाते. आश्चर्यकारक धबधबे आणि उंच पर्वतांव्यतिरिक्त, लवासा हे रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेकिंग सारख्या गोष्टींसाठी देखील ओळखले जाते.