Mother’s Day History: यावर्षी ११ मे रोजी जागतिक मातृदिन साजरा केला जात आहे. दरवर्षी मे महिन्यातील रविवारी मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो. आज आपल्या आयुष्यातील एक खूप खास दिवस आहे. जो आपण मातृदिन म्हणून साजरा करतो.
हा दिवस त्या सर्व मातांना समर्पित आहे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्याला या जगात आणण्यात, शिकवण्यात, वाढविण्यात आणि एक चांगला माणूस बनवण्यात घालवले. आज आपण मदर्स डेबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया.

‘मदर्स डे’ चा इतिहास काय आहे?
मदर्स डेचा प्राचीन इतिहास खूपच मनोरंजक आहे. या दिवसाबाबत असे म्हटले जाते की प्राचीन काळी, आईबद्दल आदर म्हणजेच आईची पूजा ग्रीसमध्ये सुरू झाली. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की त्या काळातील लोक फक्त ग्रीक देवतांच्या आईचा आदर करत होते किंवा त्यांची पूजा करत होते. मात्र, याबद्दल कोणाकडेही ठोस माहिती नाही.
याशिवाय, मदर्स डे साजरा करण्यामागे आणखी एक इतिहास आहे. असे म्हटले जाते की ऍना तिच्या आईवर खूप प्रेम करत होत्या आणि तिच्या निधनानंतर तिच्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा खास दिवस सुरू केला.
पहिल्यांदा मदर्स डे कधी साजरा करण्यात आला?
ऍनाचा हा उपक्रम अनेक वर्षांपासून लोकांनी फॉलो केला. असे म्हटले जाते की मातृदिन साजरा करण्याची पहिली कल्पना १९०८ च्या सुमारास सुचली. परंतु अनेक वर्षांच्या चढ-उतारानंतर, १९१४ च्या सुमारास तो साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
तेव्हापासून तो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील रविवारी साजरा केला जातो. या वर्षी मदर्स डे रविवार, ११ मे रोजी आहे. आधुनिक जगात अमेरिकेत पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला असे म्हटले जाते.
मातृदिनाचे महत्त्व-
आईचा आपल्या मुलावरचा विश्वास आणि प्रेम इतके खोल आणि अतूट असते की ते व्यक्त करता येत नाही. एक आई आपल्या मुलाच्या आनंदासाठी संपूर्ण जगाशी लढू शकते. एकटी आई आपल्या मुलाला वाईट नजरेपासून आणि जगाच्या स्वार्थापासून वाचवू शकते. मातृदिनाचे महत्त्व प्रत्येक आईला तिच्या योगदानाचे, मातृत्वाच्या बंधनाचे आणि समाजातील आईच्या भूमिकेचे महत्व साजरे करण्यासाठी समर्पित आहे.