केस सतत गळतात, वाढही थांबलीय? करा ‘हे’ घरगुती उपाय वेगाने होईल वाढ

केस वाढवण्यासाठी, पौष्टिक अन्न खाणे महत्वाचे आहे. याशिवाय, वाढते वय, पोषक तत्वांचा अभाव, आनुवंशिकता, हार्मोनल असंतुलन, ऑक्सिडेटिव्ह ताण, प्रदूषण आणि रसायने देखील केसांच्या वाढीस अडथळा आणू शकतात.

निरोगी केसांमुळे आपले सौंदर्य वाढते. त्यामुळे केसांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. केसांशी संबंधित कोणत्याही समस्यांसाठी, आपल्यापैकी बहुतेकांनी अनेक घरगुती उपाय करून पाहिले आहेत, जे या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून काम करतात.

केसांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपाय-

खरं तर, आपल्या स्वयंपाकघरात किंवा आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केसांच्या विविध समस्या कमी करू शकतात. ज्याप्रमाणे तांदळाचे पाणीकेसांची वाढ वाढवण्यास मदत करू शकते. त्याचप्रमाणे लिंबू आणि दही केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करू शकतात. आज आपण केसांच्या आरोग्यासाठी असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया…

 

केस गळती थांबवून वाढ होण्यासाठी उपाय-

-प्रत्येकवेळी केस धुण्यापूर्वी, कोमट खोबरेल तेलाने केसांची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणे कमी होते.

-कांदा बारीक करून त्याचा रस काढा आणि केसांच्या मुळांवर लावा . यामुळे टक्कल पडणे कमी होण्यास आणि नवीन केसांच्या वाढीस पोषण मिळू शकते.

-दही हे प्रोबायोटिक्सचे स्रोत आहे, जे केसांची वाढ आणि जाडी सुधारू शकते.

-याशिवाय, केस गळती रोखण्यासाठी तुम्ही जास्वंदीची फुले आणि ऑलिव्ह ऑइल देखील वापरू शकता.

-आवळ्याच्या तेलाने केसांना मालिश करा. यामुळे तुमचे केस जलद वाढण्यास मदत होईल.

– कांदा बारीक करून केसांना लावा. यामुळे तुमचे केस जलद वाढण्यास मदत होईल.

-तुम्ही कोरफड आणि मेथीचे दाणे बारीक करून केसांना लावू शकता, ज्यामुळे केसांची वाढ जलद होते.

– बटाटा हा जीवनसत्त्वे अ, ब आणि क चा खजिना आहे. बटाट्याचा रस लावल्याने तुमचे केस वेगाने वाढू शकतात.

 

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News