इस्त्रायलने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे त्यांना मोठं नुकसान झालं आहे. इस्त्रायलने इराणची आण्विक तळ आणि सैन्य ठिकाणच उद्ध्वस्त केली नाही तर इराणचे दोन बडे सैन्य अधिकाऱ्यांचीही हत्या केली आहे. इस्त्रायली हल्ल्यात इराणच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल हुसैन बघेरी आणि इराणचे एलिट फोर्स रिव्होल्युशनरी गाड्स कॉर्प्सचे प्रमुख कमांडर हुसैन सलामीही मारले गेले.
इराणने सांगितलं की, या हल्ल्याचा बदला नक्की घेतला जाईल. दोन्ही देशांमधील वाढलेला तणाव आणि इराण येत्या काळात इस्त्रायलवर करणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

तेलाच्या किमतीत वाढ…
हल्ल्यानंतर शुक्रवारी तेलाच्या किमतीत अचानक ७ टक्क्यांनी वाढ झाली, जी या महिन्यातील सर्वाधिक वाढ आहे. कच्च्या तेलाची वैश्विव बेंचमार्क ब्रेंट क्रूड ४.६० डॉलर म्हणजे ६.६३ वाढून ७३.९६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचलं आहे. जे २७ जानेवारीनंतर सर्वात अधिक आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ४.९९ डॉलर म्हणजेच ७.३३ टक्क्यांनी वाढून ७३.०३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे, जो २१ जानेवारीनंतर सर्वाधिक आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतीत एकाच दिवसात इतकी मोठी वाढ झाली आहे. तेलाची वाढती किमत चिंता वाढवणारी आहे, कारण इस्त्रायलाचं म्हणणं आहे की, ते इराणला अणुबॉम्ब तयार करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याविरोधात मोहीम चालवतील.
आरबीसी कॅपिटलच्या विश्लेषक हेलिमा क्रॉफ्टने सांगितलं की, एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, इराणच्या प्रत्युत्तरातील कारवाई इस्त्रायलपर्यंत सीमित राहील की, इराण इस्त्रायलहून पुढे जाऊन भागातील अन्य तळं आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर निशाणा साधेल. सिंगापुरातील अनेक तेल व्यापाऱ्यांनी सांगितलं की, या हल्ल्यात मध्य पूर्व तेल निर्यातीवर परिणाम होईल की नाही हे सांगता येणं सध्या तरी कठीण आहे. कारण इराण यावर कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल आणि अमेरिका यात हस्तक्षेप करेल की नाही हे देखील पाहावं लागेल.
स्ट्रेट ऑफ होर्मूज काय आहे, जे बंद होण्याच्या शक्यतेमुळे तेल बाजार चिंतेत आहे…
होर्मूजची खाडी आठ बेटांपासून तयार झालेला समुद्री मार्ग आहे. ज्या सात बेटांवर इराणचं नियंत्रण आहे. खाडीच्या एका बाजुला अमेरिका समर्थक अरब देश तर दुसरीकडे इराण आहे. या खाडीत दोन समुद्री मार्ग आहेत. ज्यामुळे बोटींचं दळणवळण सोपं होतं. ही खा़ी तेल व्यापारसाठी अत्यंत महत्ताची मानली जाते. कारण येथे जगातील सर्वात मोठे तेल टँकर आणि बोटीचं दळणवळण होतं. याच मार्गावरुन आशिया, अमेरिका, युरोप आणि जगातील अन्य बाजारांमध्ये मध्य पूर्वेकडील तेल पोहोचतं.