Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: उद्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता. शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते.
छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण-
त्यावेळी शिवाजी महाराज आदिलशाही आणि मुघलांशी लढा देत होते. त्यामुळे संभाजी महाराजांचे बालपण अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या काळात गेले. बालपणापासूनच त्यांना रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे शिक्षण मिळाले. महाराजांच्या जयंतीनिमित्त आज काही खास शुभेच्छा संदेश पाहूया…

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश-
सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो “”आपला संभाजी राजा”” होता”
जय संभाजी महाराज
“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…
जय संभाजी जय शंभुराजे!
शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या “छत्रपती शिवरायांचा”.
पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक,
ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र,
शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे
दुसरे छत्रपती संभाजी महाराज
या भूमंडळाचे ठाई, स्वराज्य रक्षी ऐसा नाही।
स्वराज्य राहिले काही, तुम्हा करणी।।
शिवब्रम्ह मनी स्थिरावला।
गनिमांचा तेज ढळला।।
शंभूराजे अजय असा ठरला।
शिवरुपी राजा, शिवरुपी राजा, शिवरुपी राजा।।
रूद्राचा अवतार वाघाचा ठसा होता अरे,
सह्याद्रीला विचारा त्या
माझा शंभूराजा कसा होता!
कर्तृत्व एवढं महान असावं,
नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा,
!!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज!!