Jio ने वाढवलं Airtel चं टेन्शन! 84 दिवसांच्या प्लॅनमध्ये मिळतंय OTT सब्सक्रिप्शन्स आणि बरंच काही

भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio पुन्हा एकदा चर्चेत आहे. देशभरात 46 कोटींपेक्षा जास्त वापरकर्त्यांसह Jio आपल्या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅन्ससाठी ओळखली जाते. या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, हाय-स्पीड डेटा आणि ओटीटीसारख्या अनेक फायदे असतात. खास गोष्ट म्हणजे, कंपनी सध्या 84 दिवसांच्या वैधतेसह अनेक शानदार प्रीपेड प्लॅन्स देत आहे, ज्यात युजर्सना फ्री 5G डेटा आणि इतर अनेक लाभ मिळत आहेत.

Jio चा 1029 रुपयांचा दमदार प्लॅन

या प्लॅनची किंमत 1029 रुपये असून त्यात 84 दिवसांची वैधता आहे. यामध्ये युजर्सना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा (एकूण 168GB), अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण देशात फ्री रोमिंगची सुविधा मिळते. याशिवाय दररोज 100 SMS देखील फुकट दिले जातात.

या प्लॅनची सर्वात खास बाब म्हणजे यात Amazon Prime Video, JioTV आणि JioCloud यांचे मोफत सदस्यत्वही समाविष्ट आहे. तसेच, ज्यांच्याकडे 5G स्मार्टफोन आहे आणि जे Jioच्या 5G नेटवर्कशी जोडलेले आहेत, त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.

1028 रुपयांचा दुसरा पर्याय

त्याचप्रमाणे Jio आणखी एक 84 दिवसांचा प्लॅन ₹1028 मध्ये देते. यातही दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, फ्री रोमिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. फरक इतकाच की या प्लॅनमध्ये Amazon Prime च्या जागी युजर्सना Swiggy चं प्रीमियम सदस्यत्व दिलं जातं.

Airtel चा 84 दिवसांचा प्लॅन

Airtel कंपनी 84 दिवसांच्या वैधतेसह ₹979 चा प्लॅन ऑफर करते. यात एकूण 168GB डेटा (दररोज 2GB), फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये Airtel Xstream Play अॅपद्वारे 22 हून अधिक OTT प्लॅटफॉर्म्सचा मोफत प्रवेशही दिला जातो.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News