नखं कोणत्या दिवशी कापावे? शास्त्र काय सांगते, जाणून घ्या…

नखे कोणत्या दिवशी कापावे याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या दिवशी नखे कापणे शुभ असते.

नखे  कोणत्या दिवशी कापावे याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. नखे कोणत्या दिवशी कापू नये याबद्दल सगळीकडे माहिती दिलेली असते, पण कोणत्या दिवशी कापावे याबद्दल कोणालाच फारशी माहिती नसते. आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या दिवशी नखे कापणे शुभ असते.

शुक्रवार

नखे कापण्यासाठी शुक्रवार हा दिवस सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी नखे कापल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी येते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी नखे कापल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धन, समृद्धी आणि सौंदर्य वाढवते.

बुधवार

बुधवार हा दिवस देखील नखे कापण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी नखे कापल्याने आर्थिक लाभ होतो आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, असे मानले जाते. बुध ग्रहाचा दिवस असल्याने, बुधवारी नखं कापल्याने व्यवसायात यश आणि आर्थिक लाभ मिळतो.

शनिवार आणि रविवार

शनिवार आणि रविवार हे नखे कापण्यासाठी अशुभ दिवस मानले जातात. शनिवारी नखे कापल्यास शनीची नाराजी ओढवते, शनिवारी नखं कापणे अशुभ मानले जाते. या दिवशी नखं कापल्यास शनिदेवाचा कोप होतो आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर रविवारी नखे कापल्याने कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर होतो. रविवारी नखं कापणे टाळावे, कारण यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि यशात अडथळे येतात.

गुरुवार

गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी नखे कापणे टाळावे, असे सांगितले जाते. या दिवशी नखे कापल्याने काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. या दिवशी नखं कापल्याने गुरु ग्रह कमजोर होतो.

सोमवार

नखं कापण्यासाठी सोमवार हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी नखं कापल्याने मानसिक शांती मिळते आणि चांगले आरोग्य लाभते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News