तुमच्या दातांवर राहु-केतूचा प्रभाव पडतो? ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या तुमच्या राशीसाठी टूथब्रशचा परफेक्ट रंग

जर तुमच्या कुंडलीत द्वितीय चरणात राहु, केतु आणि मंगळ यांसारखे क्रूर ग्रह असतील तर तुम्हाला दातांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या दातांवर राहु-केतूचा प्रभाव पडतो, आणि त्यानुसार तुमच्या टूथब्रशचा रंग निवडणे महत्त्वाचे आहे. राहु-केतूच्या स्थितीनुरूप तुमच्या राशीसाठी योग्य रंग निवडल्यास दातांच्या समस्या कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया…

राहु-केतू आणि दातांचा संबंध

राहु-केतू आणि दातांचा संबंध ज्योतिषशास्त्रात मानला जातो. कुंडलीतील राहू-केतूच्या स्थितीनुसार दातांच्या समस्या येऊ शकतात. राहू हा भौतिक इच्छा आणि नविन गोष्टींशी संबंधित आहे. त्यामुळे, राहूच्या प्रभावामुळे दातांची काळजी न घेणे, जास्त गोड खाणे किंवा दातांची स्वच्छता न ठेवल्यास दातांमध्ये किड लागणे, दुखणे किंवा इतर समस्या येऊ शकतात. केतू हा अलिप्तता आणि आध्यात्मिकतेशी संबंधित आहे. केतूच्या प्रभावामुळे दातांच्या समस्यांमध्ये वेदना, संवेदनशीलता किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

  • ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील द्वितीय भावात राहु-केतू किंवा मंगळ यांसारखे क्रूर ग्रह असतील, तर दातांशी संबंधित समस्या येऊ शकतात.
  • राहु-केतूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी योग्य रंगाचा टूथब्रश वापरणे फायदेशीर ठरू शकते, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. 
  • केतूच्या चुकीच्या स्थानामुळे दातांचे आजार, तसेच त्वचेचे आणि मज्जासंस्थेचे आजार होऊ शकतात.

तुमच्या राशीसाठी योग्य टूथब्रशचा रंग

मेष रास – या राशीच्या लोकांनी सिल्व्हर रंगाचा आणि प्राईम क्वालिटीचाच ब्रश वापरावा.

वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांसाठी हिरवा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे, या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचा टूथब्रश वापरल्यास राहू-केतूच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव होतो

मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांसाठी पांढरा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे, त्यांनी पांढऱ्या रंगाच्या टूथब्रशचा वापर करावा. पांढऱ्या रंगाचा टूथब्रश वापरल्यास त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि दातांच्या समस्यांपासून दिलासा मिळेल.

कर्क रास – क्रीम, गुलाबी आणि हलक्या नारिंगी रंगाचा ब्रश तुमच्या दातांसाठी फार चांगला ठरेल. तर, काळा, निळा रंगाचा ब्रश तुमच्या दातांसाठी चांगला नाही.

सिंह रास – सिंह राशीच्या लोकांसाठी हिरवा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे, या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचा टूथब्रश वापरावा. यामुळे त्यांना दातांच्या समस्यांपासून दिलासा मिळू शकतो. 

कन्या रास – कन्या राशीच्या लोकांनी सिल्व्हर रंगाचा टूथब्रश वापरण्याचा प्रयत्न करावा. यामुळे दात आणि मौखिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

तूळ रास – तूळ राशीच्या लोकांनी लाल रंग किंवा लाल रंगाचे मिश्रण असलेला टूथब्रश वापरावा.

वृश्चिक रास – या राशीच्या लोकांनी हलका पिवळा कलरच्या टूथब्रशचा वापर करावा.

धनु रास – काळ्या आणि निळ्या रंगाच्या ब्रशचा प्रयोग तुमच्या दातांसाठी चांगला ठरेल.

मकर रास – मकर राशीच्या लोकांनी हलका निळा किंवा काळ्या रंगाच्या ब्रशचा वापर करावा. निळा रंग शांतता आणि सकारात्मकता दर्शवतो, तर काळा रंग स्थिरता आणि संरक्षण दर्शवतो. 

कुंभ रास –  कुंभ राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळ्या रंगाचा टूथब्रश वापरल्याने राहू-केतूच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव होतो आणि दातांचे आरोग्य सुधारते.

मीन रास – मीन राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो. त्यामुळे, लाल रंगाचा टूथब्रश वापरल्यास दातांचे आरोग्य चांगले राहते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News