कबुतरं धोकादायक, सरकारकडून गंभीर दखल, मुंबईतील कबुतरखाने होणार बंद

मुंबई महापालिकेच्या हद्दीत सध्या 151 कबूतरखाने आहेत. काही कबूतरखाने हे न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झाले होते, मात्र ते पुन्हा सुरु झाल्याचं सामंत यांनी सांगितलंय

मुंबई- कबुतरांमुळे वाढणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेत राज्य सरकारनं यावर गंभीर उपाययोजना करण्याचं ठरवलेलं आहे.याचाच एक भाग म्हणून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आगे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याची घोषणा विधान परिषदेत केली.

दाणे टाकून पोसलेली कबुतरं आणि कबुतरखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. हे कबूतरखाने मुंबईकरांच्या जीवावर उठल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कबुतरांची विष्ठा, पंखांचे सूक्ष्म कण यामुळे श्वसनाचे विकार वाढत चालले होते. याची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे.

तातडीनं अभियान राबवणार

मुंबईच्या अनेक भागात कबुतरांना धर्मकार्याच्या वानाखाली दाणे टाकले जातात, अशी ठिकाणी कबूरखाने निर्माण झालेले आहेत. याचा त्रास परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना होतोय. आता हे कबूरखाने बंद करण्यासाठी सरकारच्या वतीनं विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेला याबाबत आदेश देण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या आमदारंनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

कबुतराच्या विष्ठेमुळे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचं भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात सांगितलं. कबुतरांच्या विष्ठेमुळे मामीला हायपर सेन्सेटिव्ह आजार जडला, त्यांच्यासोबत वॉकला जाणाऱ्या दोन ते तीन महिलाही बाधित झाल्याचं वाघ यांनी यावेळी सांगितलं. या आजारात श्वास घ्यायला त्रास होतो, बाहेरुन ऑक्सिजन द्यावा लागत असल्याचं सांगण्यात आलंय.

मुंबईत किती कबुतरखाने

मुंबई महापालिकेच्या हद्दीत सध्या 151 कबुतरखाने आहेत. काही कबुतरखाने हे न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झाले होते, मात्र ते पुन्हा सुरु झाल्याचं सामंत यांनी सांगितलंय. कबुतरांना धान्य टाकू नये यासाठी जनजागृतीची गरजही सामंत यांनी अधोरेखित केलीय. ही जनजागृतीही आगामी काळात केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कबुतरखान्यांविरोधात यापूर्वीही अनेकदा मोहीम राबवण्यात आलेली आहे. शहरातील चिमणी-कावळ्यांची  जागा कबुतरांनी घेतली असून त्यांचा प्रचंड त्रास मुंबई आणि परिसरात रहिवाशांना होत असल्याचं  समोर आलंय. या त्रासताून सुटका करण्यासाठी एकट्या  मुंबईतच नव्हे तर राज्यभरात कबुतरविरोधी अभियान राबवण्याची  गरज व्यक्त होतेय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News