PhonePe, Google Pay, Paytm यांसारख्या UPI अॅप्सचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक वेळा सर्व्हरवर ताण येतो आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळेस पेमेंट अडकण्याच्या समस्या जाणवतात. अशा वेळी काही कारणांमुळे तुमचे UPI व्यवहार अडकतात आणि अकाउंटमधून पैसे डेबिट होतात, पण व्यवहार पूर्ण होत नाही. मात्र अशावेळी काळजी करू नका, हे पैसे सहसा लवकरच परत येतात.
तात्काळ काय कराल?
कधी कधी तुमच्याच अकाउंटमधून पैसे कटतात, पण ते मर्चंट किंवा रिसिव्हरकडे पोहोचत नाहीत. अशावेळी खालील उपाय करा:

1. मर्चंट किंवा रिसिव्हरशी त्वरित संपर्क साधा. खात्री करा की त्यांच्याकडे पैसे पोहोचले आहेत की नाही.
2. 60 सेकंदांत ट्रान्झॅक्शन फेलचा मेसेज येतो. जर तो नसेल आला आणि पेमेंट ‘पेंडिंग’ दाखवत असेल, तर तुमच्या UPI सेवा पुरवठादाराशी संपर्क करा.
तक्रार कशी करावी?
1. PhonePe, Google Pay, Paytm यापैकी जे अॅप वापरलं असेल त्याची ‘Transaction History’ उघडा.
2. संबंधित व्यवहार निवडा.
3. ‘Wrong Transfer’ किंवा ‘Dispute’ असा पर्याय निवडा.
4. त्यानंतर Transaction ID, UPI ID, रक्कम, तारीख आणि वेळ यासारखी माहिती भरून तक्रार नोंदवा.
NPCI आणि RBI कडे कसा कराल संपर्क?
जर तुमचं UPI ट्रान्झॅक्शन अडकलं असेल आणि अॅप किंवा बँककडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर तुम्ही NPCI आणि नंतर RBI कडे तक्रार करू शकता.
तुमच्या बँकेशी संपर्क करा
सर्वप्रथम, ट्रान्झॅक्शनमध्ये अडचण असल्यास लेंडर बँकेच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
प्रत्येक बँकेकडे UPI व्यवहारांसाठी वेगळा रिड्रेसल मेकॅनिझम असतो.
काही वेळा बँक तुमच्याकडून लिखित तक्रार मागू शकते किंवा ब्रँचला भेट देण्यास सांगते.
NPCI कडे तक्रार कशी करावी?
जर बँक आणि अॅपकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही NPCI (National Payments Corporation of India) कडे तक्रार नोंदवू शकता.
1. NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. Dispute Redressal सेक्शनमध्ये तुमच्या ट्रान्झॅक्शनची माहिती भरा.
3. आवश्यक सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करा.
जर NPCI कडूनही समाधान न मिळाल्यास, पुढील पायरी घ्या.
RBI कडे तक्रार कधी करता येते?
• NPCI कडे तक्रार दाखल केल्यानंतर 30 दिवसांनी जर तुमची समस्या सुटली नसेल, तर तुम्ही RBI (Reserve Bank of India) कडे तक्रार करू शकता.
UPI वापरताना लक्षात ठेवायच्या गोष्टी:
पेमेंट करण्याआधी रिसीव्हरची UPI ID पडताळा
खात्री करा की रिसीव्हरचं नाव UPI ID शी जुळतंय का
QR कोड स्कॅन करताना सावधगिरी बाळगा
अनोळख्या UPI लिंक्सवर क्लिक करू नका.