CM Devendra Fadnavis – बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची व महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्याची राजधानी नागपूर येथे हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
किती कोटीची गुंतवणूक?
दरम्यान, नागपुरात सुमारे 8 हजार कोटी रुपये गुंतवणुक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार करण्यात आला आहे. नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्याचे प्रत्यक्ष काम 2026 पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून, या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये सुमारे 8 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना…
या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे. हा करार भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देणारा टप्पा ठरणार आहे. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला हा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल. नागपूर विमानतळाजवळ हे केंद्र असल्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ घेता येणार आहे. यामुळे भारताच्या वाढत्या एरोस्पेस पुरवठा साखळीतही योगदान मिळणार आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
सामंजस्य कराराचा तपशील:
– प्रकल्पाचे नाव : हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना
– रोजगार संधी : 2000
– प्रस्तावित प्रारंभ वर्ष : 2026
– ठिकाण : नागपूर
– गुंतवणूक : ₹8000 कोटी (8 वर्षांत)