मुंबई: लाडक्या बहिणींनो, अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे. कारण, एप्रिल महिन्याच्या 1500 रूपये हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हप्ता, पैसे नेमके कधी जमा होणार याबाबत महिलांमध्ये संभ्रम पाहायला मिळत होता. अनेकदा तारीख बदलली होती. आता याबाबत अधिकृतरित्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
2 दिवसांत पात्र महिलांना पैसे मिळणार
एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिलचे पैसे मिळणार आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिलचे पैसे मिळणार आहेत. याबाबत आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

2,100 रूपयांचं काय झालं?
लाभार्थी महिलांना दीड हजार नाही तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या काळात करण्यात आली होती. मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी शक्यता होती, मात्र या अधिवेशनात देखील कुठलाही निर्णय झाला नाही, उलट 2100 रूपयांसाठी कुठलीचं तरतुद नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता राज्यातील महिलांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान एप्रिलच्या हप्त्याबाबत सातत्याने नवनवे अंदाज वर्तवले जात होते. सुरूवातील अक्षय्य तृतीयेची तारीख सांगितली गेली होती. पण आज अखेर पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे 2 दिवसांत सर्व पात्र महिलांना पैसे मिळतील.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही… pic.twitter.com/K8I5wo6Asq
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) May 2, 2025