अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताने बॉलिवूडला धक्का, सनी देओल ते रितेश देशमुख कोण काय म्हणालं? वाचा

Air India Plane Crash : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ आज गुरुवारी एअर इंडियाचे विमान उड्डाणादरम्यान कोसळले. वृत्तसंस्था एएनआयनुसार, लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान, फ्लाइट एआय १७१ सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद विमानतळावर टेकऑफ दरम्यान कोसळले. अपघातस्थळावरून धुराचे दाट लोळ उठतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले. या प्रकरणावर बॉलिवूड स्टार्स प्रतिक्रिया देत आहेत. रितेश देशमुख आणि रणदीप हुडा सारख्या बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. या घटनेने स्टार्स खूप दुःखी आहेत.

परिणीती चोप्राची प्रतिक्रिया

परिणीती चोप्राने लिहिले, ‘आज दुर्दैवी एअर इंडियाच्या विमानातील कुटुंबियांच्या वेदनांची कल्पनाही करू शकत नाही. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.’

सनी देओलची प्रतिक्रिया

सनी देओलने एक्स वर लिहिले, ‘अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला. ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या आत्म्यांना शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना या अकल्पनीय काळात शक्ती मिळो.’

रितेश देशमुखची प्रतिक्रिया

रितेश देशमुखने शोक व्यक्त केला आणि लिहिले, ‘अहमदाबादमधील दुःखद विमान अपघाताबद्दल ऐकून मन दुखावले आणि धक्का बसला. या अविश्वसनीय कठीण काळात मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे.’

रणदीप हुड्डाची प्रतिक्रिया

रणदीप हुड्डाने लिहिले, ‘अहमदाबादमधील दुःखद विमान अपघाताबद्दल ऐकून मन दुखावले. मृतांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो.’

थलापती विजय यांची प्रतिक्रिया

थलापती विजय यांनीही यावर आपली प्रतिक्रिया शेअर केली, ‘अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडिया अहमदाबाद-लंडन विमानाच्या घटनेबद्दल ऐकून खूप धक्का बसला. सर्व प्रवासी आणि क्रूच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.’

अक्षय कुमार याची प्रतिक्रिया

अक्षय कुमार यानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे, ‘एअर इंडियाच्या अपघाताने धक्का बसला आहे आणि अवाक आहे. सध्या फक्त प्रार्थना.’


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News