वास्तुनुसार झाडू ठेवण्याची योग्य जागा आणि पद्धत कोणती? जाणून घ्या…

असे मानले जाते की, ज्या घरात झाडूचा मान असतो, तेथे देवी लक्ष्मी निवास करते आणि त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. झाडूशी संबंधित वास्तू नियम जाणून घेऊया....

हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि झाडूला विशेष महत्त्व दिले जाते. झाडूला पायांनी स्पर्श करणे अशुभ मानले जाते कारण झाडू संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. वास्तु आणि ज्योतिषशास्त्रात झाडूशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत, ज्याचे पालन केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. झाडू ही अशीच एक वस्तू आहे जी प्रत्येकाच्या घरात असते. आपल्या सर्वांना माहित आहे की झाडू स्वच्छतेसाठी वापरला जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की झाडूशी संबंधित काही वास्तू उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला झाडूशी संबंधित काही वास्तु टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकता. झाडूशी संबंधित वास्तूचे नियम जाणून घेऊया.

झाडू दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा

वास्तुशास्त्रानुसार झाडू घराच्या दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवणे योग्य मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिशेला झाडू ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते, असे म्हटले जाते. या दोन्ही दिशा लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जांशी संबंधित आहेत, ज्यामुळे घरात समृद्धी आणि सकारात्मकता टिकून राहते. 

दोन झाडू एकत्र ठेवू नका

आपल्या सर्वांच्या घरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त झाडू असतात. बऱ्याच वेळा लोक जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे एक झाडू दुसऱ्या झाडूवर ठेवतात किंवा दोन झाडू एकत्र ठेवतात. तुम्हाला कदाचित हे कधीच लक्षात आले नसेल. पण असे करणे अशुभ मानले जाते. दोन झाडू एकत्र ठेवू नयेत, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात भांडणे होण्याची शक्यता असते. 

मुख्य प्रवेशद्वारावर झाडू ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर झाडू ठेवणे अशुभ मानले जाते. झाडू हे लक्ष्मी देवीचे प्रतीक असले तरी ते कचरा साफ करण्यासाठी वापरले जाते. म्हणून, ते प्रवेशद्वारावर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. याशिवाय कुटुंबात तणाव आणि आर्थिक संकट येण्याची शक्यता वाढते. झाडू घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि सकारात्मक ऊर्जा येण्यास अडथळा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार, झाडू मुख्य प्रवेशद्वारावर ठेवणे टाळावे. योग्य ठिकाणी आणि पद्धतीने झाडू ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

झाडू ठेवण्याची योग्य जागा

वास्तुनुसार, झाडू वापरल्यावर तो कोणाला सहज दिसणार नाही, अशा ठिकाणी ठेवणे योग्य आहे. विशेषतः घराच्या दक्षिण-पश्चिम किंवा नैर्ऋत्य दिशेला झाडू ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि लक्ष्मीची कृपा होते. झाडू नेहमी आडवा ठेवावा, कधीही उभा किंवा उलटा नाही. झाडू लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो, त्यामुळे तो योग्य ठिकाणी ठेवल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो. वास्तुनुसार, झाडू नेहमी लपवून ठेवावा आणि तो कोणाला दिसणार नाही, अशा ठिकाणी ठेवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि लक्ष्मीची कृपा होते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News