स्वप्नात सोने-चांदीचे दागिने पाहणे हे शुभ आणि अशुभ दोन्हीही असू शकते. स्वप्नशास्त्रात या दागिन्यांचा अर्थ वेगवेगळा मानला जातो. काहीवेळा हे शुभ संकेत दर्शवतात, तर काहीवेळा ते अशुभ संकेत देऊ शकतात. आपण अनेकदा स्वप्नात अशा गोष्टी पाहतो ज्यांचा आपण विचारही केला नाही. अनेकदा आपण स्वप्नात ज्या काही गोष्टी पाहतो, त्या आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे संकेत देतात. चला तर मग आज जाणून घेऊया जर एखाद्याला स्वप्नात सोनं आणि चांदी दिसली तर ते कशाचे संकेत आहेत.
स्वप्नात स्वतःला दागिने घातलेले पाहणे
स्वप्नात स्वतःला दागिने घातलेले पाहणे शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक लाभ किंवा तुमची व्यवसायात प्रगती होऊ शकते.

स्वप्नात दागिने चोरीला जाणे
स्वप्नशास्त्रानुसार, दागिने चोरीला गेल्याचे स्वप्न पाहणे हे अशुभ लक्षण मानले जाते. हे स्वप्न तुमच्यासाठी नुकसान, फसवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्येचे संकेत देते. स्वप्नशास्त्रानुसार, दागिने चोरीला गेल्याचे स्वप्न पाहणे हे आगामी काळात व्यवसायात किंवा नोकरीत धोक्याची शक्यता दर्शवते.
स्वप्नात दागिने भेट म्हणून मिळणे
स्वप्नात स्वतःला दागिने खरेदी करताना पाहणे
स्वप्नात स्वतःला दागिने खरेदी करताना पाहणे, विशेषत: सोन्याचे दागिने, हे यश आणि आर्थिक लाभाचे संकेत असू शकते. स्वप्नात स्वतःला दागिने खरेदी करताना पाहणे हे स्वप्न शुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो किंवा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)