पक्ष फोडण्यासाठी मोदी, शाह व फडणवीसांनी भय व भ्रष्टाचाराची निर्मिती केली, संजय राऊत यांचा प्रहार

युद्ध थांबवण्याऐवजी इस्राईलची बाजू घेत इराणवर बॉम्ब टाकले आहेत. ट्रम्प हे मोदींचे मित्र आहेत. पण ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका आहे. ट्रम्प हे इराण इस्रायलमधील युद्ध का थांबवत नाहीत? मोदींनी त्यांना विचारायला हवे असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut -अडीच तीन वर्षांपूर्वी भाजपाने शिवसेना फोडली. त्यानंतर एक वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. भय आणि भ्रष्टाचार हाच भाजपाचा मंत्र असून, राज्यात त्यांनी दोन पक्ष फोडले. मोदी, शहा आणि फडणवीस यांनी राज्यसह देशात भय आणि भ्रष्टाचाराची निर्मिती केली. आणि तपास यंत्रणा आणि भ्रष्टाचाराच्या भीतीने आमदार, खासदार पळून गेले. त्यामुळे आज भाजपाच्या दबावखाली आणि भयाखालीच पळून गेलेले नेते वक्तव्य करतात, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

अटक होणार या भीतीने पळून गेले…

दरम्यान, आपल्या पक्षातील आमदार खासदार हे दुसरीकडे फुटून जावे, असे कोणालाच वाटणार नाही. मात्र ज्या गद्दारांना शेण खायचे होते. त्यांना कोण थांबवणार. पैसा आणि सत्तेची चटक लागलेली आहे. आणि त्यातून भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार केल्यामुळे चौकशी आणि त्यातून अटक होऊ या भीतीमुळे आमदार, खासदार भाजपाकडे गेले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. प्रत्येकाचे दुखणे आणि आजार वेगळे आहेत. गुलाबराव पाटील यांच्या खात्यात 40 ते 50 कोटी रुपये जमा झाले. ते कुठून जमा झाले? कारण ईडीची कारवाई आणि अटक होण्याच्या भीतीने ते भाजपाला जाऊन मिळालेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

राज्यात भ्रष्टाचाराचा कॅन्सर…

राज्यात पैसा, सत्ता याच्यामुळे भ्रष्टाचाराचा कॅन्सर पसरला आहे. भय आणि भ्रष्टाचार यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार, खासदार पळून गेले. आणि भय भ्रष्टाचाराचे निर्मिती हे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. असा आरोप संजय राऊत यांनी करत भाजपावर टीकास्त्र डागले. जगात शांतता हवी, आता इराण-इस्रायलमध्ये तणावाची परिस्थिती सुरू आहे. याच्यामध्ये अमेरिकेनेही सहभाग घेतला आहे.

परंतु आता असे असताना मोदीने प्रेसिडेंट यांना फोन करायला हवा होता, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यांनी युद्ध थांबवण्याऐवजी इस्राईलची बाजू घेत इराणवर बॉम्ब टाकले आहेत. ट्रम्प हे मोदींचे मित्र आहेत. पण ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका आहे. ट्रम्प हे इराण इस्रायलमधील युद्ध का थांबवत नाहीत? मोदींनी त्यांना विचारायला हवे असे संजय राऊत म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News