मुंबईत २८ जूनपर्यंत के पूर्व विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा, पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे पालिकेचे आवाहन

संबंधित भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Mumbai Water Supply – मुंबईकरांच्या पाण्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांनो, रविवारी २२ जूनपासून ते २८ जूनपर्यंत पाणी जपून वापरा, कारण या दिवसांमध्ये के पूर्व विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.  त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

मेट्रो ७ अ प्रकल्पाच्या कामांमुळे…

दरम्यान, मुंबई मेट्रो-७ अ प्रकल्प अंतर्गत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे, के पूर्व प्रभागातील, बामणवाडा अंधेरी (पूर्व) जवळ, वेरावली जलाशयाच्या (२४ x ७) कार्यान्वित असलेल्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या निगमवाहिनीखाली बोगदा खणन संयंत्राद्वारे खोदकाम करण्यात येणार आहे. सदर खोदकाम रविवार, दिनांक २२ जून २०२५ पासून शनिवार, दिनांक २८ जून २०२५ या कालावधीत सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० पर्यंत आणि रात्री ९.३० ते मध्यरात्री नंतर ३.३० वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे के पूर्व विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

कमी दाबाने पाणीपुरवठा कुठे

(१) विलेपार्ले (पूर्व) – सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० वाजेदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे

(२) जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा, अंधेरी-कुर्ला मार्ग (अंधेरी स्थानक ते पश्चिम द्रुतगती मार्ग) – रात्री ८.०० ते ९.३० वाजेदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे

दरम्यान, कृपया संबंधित भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News