हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे आणि ते घरात सुख आणि समृद्धी आणते. हिंदू धर्मात मोरपीस खूप शुभ मानले जाते. त्याला विशेष महत्त्व आहे. मोरपीस भगवान श्रीकृष्णालाही खूप प्रिय आहे. अनेक लोक ते घरी ठेवतात. घरात मोरपीस ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा भरली जाते. घरात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी मोरपंख हा एक चांगला मार्ग आहे, परंतु तो योग्य दिशेला ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही वास्तु नियमांचे पालन केले तर तुम्हाला नक्कीच शुभ फळे मिळेल.
घरात मोरपंख ठेवण्याची योग्य दिशा
घरात मोरपंख ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार, पूर्व किंवा उत्तर दिशा योग्य आहे. या दिशांना मोरपंख ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक स्थिती सुधारते. पूर्व दिशा या दिशेला मोरपंख ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. उत्तर दिशा धन आणि समृद्धीची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला मोरपंख ठेवल्याने घरात पैशाची आवक वाढते. ईशान्य दिशा ही देवस्थान मानली जाते. या दिशेला मोरपंख ठेवल्याने घरात सकारात्मकता टिकून राहते. जर तुम्हाला आर्थिक लाभ हवा असेल, तर तुम्ही तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी मोरपंख ठेवू शकता, असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही.

घरात मोरपंख ठेवताना काय काळजी घ्यावी
मोरपंख नेहमी स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. धूळ किंवा घाण असल्यास, ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात. तुटलेले किंवा खराब झालेले मोरपंख घरात ठेवू नये. ते त्वरित काढून टाकावेत. मोरपंख स्वच्छ आणि व्यवस्थित असावेत, पंख फाटलेले किंवा खराब झालेले नसावेत, मोरपंख नेहमी आदरपूर्वक ठेवावेत, पंख जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये.
घरात मोरपंख ठेवण्याचे फायदे
घरामध्ये मोरपंख ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, सुख-समृद्धी वाढते आणि पैशाची आवक वाढते. घरात सुख-शांती नांदते. आर्थिक अडचणी कमी होतात. घरात मोरपंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. ज्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे, त्यांनी घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला मोरपंख ठेवावा, ज्यामुळे राहू दोष कमी होतो.
घरात या दिशेला मोरपंख ठेऊ नये
घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला मोरपंख ठेवणे टाळावे, कारण या दिशा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, असे वास्तूशास्त्र सांगते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)