पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिज संघाचा १५९ धावांनी पराभव केला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, त्यांनी ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली. या सामन्यातील विजय किंवा पराभवापेक्षा पंचांच्या एका निर्णयांची जास्त चर्चा सुरू आहे. वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी पंचांच्या निर्णयांवर संताप व्यक्त केला. अशा स्थितीत आता सॅमी यांना पंचांवर टीका केल्याबद्दल त्यांच्या सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
पंचांच्या निर्णयांवर सॅमीने व्यक्त केली निराशा

सामन्यानंतर, प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी टीव्ही पंच एड्रियन होल्डस्टॉकवर जाहीर टीका केली आणि डीआरएस सारख्या निर्णयांमध्ये सातत्य राखण्याचे आवाहन केले. झेलबाद बाद होण्याच्या अशाच दोन प्रकरणांमध्ये होल्डस्टॉकचे निर्णय वेगळे होते याबद्दल सॅमीने निराशा व्यक्त केली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडला नॉट आउट घोषित करण्यात आले, तर वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज शाई होपला आउट घोषित करण्यात आले. वेस्ट इंडिजच्या प्रशिक्षकांनी कर्णधार रोस्टन चेस आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीन यांच्याशी संबंधित एलबीडब्ल्यू रेफरल्सचाही उल्लेख केला.
डॅरेन सॅमीने आपली चूक मान्य केली
वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी सामनाधिकाऱ्यांविरुद्ध सार्वजनिक टीका किंवा अनुचित टिप्पणी केल्याबद्दल आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. यानंतर औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती. तर प्रशिक्षक म्हणून हा त्याचा पहिलाच कसोटी सामना होता.
वेस्ट इंडिजचा पराभव
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १८० धावा केल्या. पहिल्या डावात १९० धावा करून वेस्ट इंडिजने १० धावांची आघाडी घेतली. यानंतर, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी खालच्या फळीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. संघाकडून ट्रॅव्हिस हेड, ब्यू ब्रूस्टर आणि अॅलेक्स कॅरी यांनी अर्धशतके झळकावली. या खेळाडूंमुळेच ऑस्ट्रेलियाने ३१० धावा केल्या. यानंतर, दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि संघ फक्त १४१ धावांवर ऑलआउट झाला. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा संघ मालिकेत ०-१ असा पिछाडीवर आहे.