Google new feature : फोन हरवणे किंवा चोरी जाणे जितके दुःखदायक असते, तितकेच ते त्रासदायकही ठरते. कारण डिव्हाइसपेक्षा जास्त काळजी फोनमध्ये असलेल्या डेटाची लागते. मात्र हे सगळे टेन्शन आपल्याला असते. चोरांची मात्र चांदीच होते, कारण सेकंडहँड मार्केटमध्ये त्यांना या फोनचे चांगले पैसे मिळतात.
गुगलच्या थेफ्ट प्रोटेक्शन फीचर असूनही फोन चोरी होतोच. पण अशा वेळी एखादे असे फीचर मिळाले, तर ज्यामुळे फोन रीसेट करणे केवळ कठीणच नव्हे, तर अगदी अशक्यच होईल, तर किती छान होईल, नाही का? तर मग टेन्शन घेऊ नका, कारण असंच काहीसं लवकरच घडणार आहे.

गुगलचा नवा प्लॅन
खरे तर, गुगल आता फोन रीसेट करण्याच्या प्रोसेसला आणखी सुरक्षित आणि मजबूत बनवण्याच्या तयारीत आहे. टेक दिग्गज गुगलने Android ऑपरेटिंग सिस्टममधील Factory Reset Protection (FRP) ला जवळपास अभेद्य (impenetrable) बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
चोरी झालेला फोन बिनकामाचा होणार
गुगलची वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्स या महिन्याच्या २०/२१ तारखेला होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Android 16 या ऑपरेटिंग सिस्टिमच्या नव्या आवृत्तीचा परिचय करून देणार आहे.
Factory Reset Protection (FRP) हे या सिस्टिममधील एक महत्त्वाचं आणि नविन टूल असेल. या टूलच्या आगमनानंतर, चोरी झालेला Android स्मार्टफोन फॅक्टरी रीसेट करणे जवळपास अशक्य होणार आहे. यामुळे फोन चोरांसाठी उपयोगी नसून केवळ एक पेपरवेट बनून राहील!
सध्या जेव्हा फोन चोरी होतो, तेव्हा चोर थर्ड पार्टी सॉफ्टवेअरच्या मदतीने फोनला फॅक्टरी रीसेट करून तो एकदम नवीनसारखा बनवतो. ही प्रक्रिया अत्यंत कठीण असते आणि यामध्ये फोनमधील सगळा डेटा उडतो. मात्र, चोराचा उद्देश पूर्ण होतो.
FRP (Factory Reset Protection) आल्यानंतर असे करणे शक्यच राहणार नाही, कारण यानंतर चोराला दोन गोष्टी असणे आवश्यक असतील, एकतर त्याच्याकडे फोनचा पासवर्ड असावा किंवा त्या फोनशी संबंधित Google अकाउंटचा अॅक्सेस असावा. यापैकी एकही गोष्ट नसल्यास, फोन वापरणं किंवा रीसेट करणे अशक्य होईल.
हे दोन्ही त्याच्याकडे असतीलच असे नाही; नाहीतर फोन त्याला काही उपयोगी राहत नाही. म्हणजेच, फोन सेकंडहँड मार्केटमध्ये विकला जाणार नाही, अगदी तो त्याचे स्पेअर पार्ट्स काढून विकले तरीही.
Factory Reset Protection (FRP) चा फायदा युजर्सनाही होणार आहे. म्हणजे, जर चोर फोन रीसेट करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याचा नोटिफिकेशन गुगलच्या इनबॉक्समध्ये येणारच. अशा परिस्थितीत फोनची लोकेशन ट्रॅक करणे शक्य होईल.
युजर्स Google’s Find My Device मध्ये जाऊन हे फीचर इनेबल करू शकतील. त्यानंतर, जर चोर किंवा कोणीतरी फोन रीसेट करण्याचा प्रयत्न करेल, तर FRP मध्ये हस्तक्षेप होऊन त्याचा प्रभाव सुरू होईल. हे फीचर Android युजर्सना या वर्षाच्या अखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे