आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणे खूप कठीण आहे. या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ काढू शकत नाहीत. आपल्याला दररोज व्यायाम करायला जमत नाही. तेव्हा आपल्यासाठी बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे सायकलिंगचा. सायकल चालवल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. पाहुयात रोज सकाळी किती वेळ सायकलिंग करायला हवी? आपल्या शरीरासाठी सायकलिंग कशी फायदेशीर ठरते? जाणून घ्या
मानसिक तणाव कमी होतो
सायकलिंग एक उत्कृष्ट शारीरिक व्यायाम आहे जो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे नैराश्य आणि चिंता कमी होण्याचा धोका कमी होतो. सायकलिंगमुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे तणाव कमी होतो.सायकलिंगमुळे शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि मूड सुधारतो. सायकलिंग करताना एकाग्रता वाढते. सायकलिंगमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते.

वजन कमी होण्यास मदत होते
सायकलिंग एक उत्कृष्ट व्यायाम आहे जो वजन कमी करण्यास मदत करतो. सायकलिंगमुळे कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होते. रोज 30 मिनिटे सायकलिंग केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वेगाने सायकल चालवल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी सायकलिंगसोबतच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
स्नायू मजबूत होतात
सायकलिंगमुळे स्नायू मजबूत होतात. सायकलिंग एक प्रकारचा एरोबिक व्यायाम आहे, जो शरीराच्या अनेक भागांसाठी फायदेशीर आहे, विशेषत: पाय, मांड्या आणि नितंबांचे स्नायू. सायकलिंग केल्याने स्नायूंचा व्यायाम होतो आणि ते मजबूत होतात. सायकलिंग करताना पायांचे पेडल फिरवल्याने पाय आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. सायकलच्या हँडलबारला धरून सायकल चालवल्याने हाताचे आणि खांद्याचे स्नायू देखील मजबूत होतात. सायकलिंगमुळे कंबरेचे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे पाठदुखी कमी होते.
रोज किती वेळ सायकलिंग करायला हवी?
दररोज किमान 20-25 मिनिटे तरी सायकल चालवणे फारच आवश्यक आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सायकलिंग करू शकता. किमान २० ते ३० किमी सायकलिंग केली पाहिजे. तुम्ही एक तास किंवा अधिक सायकल चालवू शकता. जर तुम्ही आता सुरुवात करत असाल तर तुमच्यासाठी १५ ते २० मिनिटे पुरेसे आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)