वैभवच्या शतकाने विक्रमांचा पाऊस, 15 वर्षापूर्वीचे ‘तो’ रेकाॅर्ड मोडला

आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने पुणे संघाच्या विरोधात बंघळूरू कडून अवघ्या 30 चेंडून शतक केले होते.

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक बनवण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशी यांच्या नावावर झाला आहे. वैभव 14 वर्ष 32 दिवसांचा असताना आयपीएलमध्ये गुजरात विरूद्धच्या सामन्यात अवघ्या 35 चेंडूत शतक झळकवले.

वैभव सर्वात कमी वयात शतक बनवणारा फलंदाज बनत असताना त्याने महाराष्ट्राच्या विजय झोल याचा कमी वयात शतक बनवण्याचा विक्रम मोडला. विजय झोल याने 2013 मध्ये मुंबई विरूद्धच्या सामन्यात 18 वर्ष 118 दिवसांचा असताना शतक केले होते. त्यामुळे 15 वर्षापूर्वीचा लहान वयात शतक करण्याचा विजयचा विक्रम वैभवने मोडला.

कमी वयात शतक झळकवणारे फलंदाज

लहान वयात शतक झळवण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशी याच्या नावे झाला आहे. यापूर्वी विजय झोलच्या नावावर हा विक्रम होते. त्यानंतर परवेझ होसेन याने 18 वर्ष 179 दिवसाचा असताना शतक केले होते. तसेच फ्रान्सचा फलंदाज गुस्ताव मॅककिऑन याने 18 वर्ष 280 दिवसांचा असताना स्वित्झर्लंड विरुद्ध शतक झळवले होते.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक

आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने पुणे संघाच्या विरोधात बंघळूरू कडून अवघ्या 30 चेंडून शतक केले होते. दुसऱ्या स्थानावर वेगवान शतक करण्यात वैभव सूर्यवंशी हा आहे. त्याने गुजरात विरुद्धा अवघ्या 35 चेंडूत शतक केले. त्याच्या आधी युसूफ पठान याच्या नावावर वेगवान शतक करण्याचा विक्रम होता. युसूफ आता दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर गेला आहे. त्याने 2010 मध्ये 37 चेंडूत मुंबई विरुद्ध शतक केले होते. तर, वेगवान शतक करण्यात चौथ्या स्थानावर डेव्हिड मिलर आहे. त्याने 2013 मध्ये पंजाबकडून खेळताना बंगळूरू विरुद्ध 38 चेंडूत शतक केले होते.

वैभवच्या शतकाने गुजरात तिसऱ्या स्थानावर

आयपीएलमध्ये सर्वाधिक पाॅईंटसह एक नंबरला असलेली गुजरात राजस्थानच्या पराभवानंतर तिसऱ्या स्थानावर आली आहे. सर्वाधिक 14 पाॅईंटसह बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर 12 पाॅईंटसह मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहे.तर, दिल्ली कॅपिटल्स चौथ्यास्थानावर आहे.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News